मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसरा सामना रविवार, २० जुलै रोजी लंडन येथील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ लंडनमध्ये दाखल झाला आहे. मात्र संघाचा स्टार खेळाडू हॉटेलमधून अचानक गायब झाला. यामुळे सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. (Rohit Sharma)
https://prahaar.in/2026/07/17/corona-alert-339-corona-patients-in-the-country-kerala-karnataka-maharashtra-tamil-nadu-health-department-alert/
एअर पोर्टवरून खाजगी कारमध्ये बसून निघून गेला…
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ लंडन एअरपोर्टला दाखल झाला. याचा व्हिडिओही सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. मात्र, संघातील या खेळाडूने हॉटेलवर पोहोचताच सर्वांपेक्षा वेगळी भूमिका घेतली. तो बसमधून उतरून हॉटेलमध्ये जाण्याऐवजी आपलं सामन घेऊन स्वत:च्या कारमध्ये बसून निघून गेला. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून, किंग कोहली आहे.
https://prahaar.in/2026/07/18/wont-join-the-nda-jayant-patil/
Virat Kohli arrived at the team hotel in London and then left for his home in his car.❤️ pic.twitter.com/XRezGiX0WO
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 17, 2026
विराट हॉटेलमध्ये न थांबता गेला कुठे?
मिळालेल्या माहितीनुसार , विराट कोहली संघासोबत हॉटेलमध्ये न थांबता लंडन येथील आपल्या घरी गेला आहे. विराट आणि अनुष्का शर्मा काही काळापासून त्यांच्या दोन्ही मुलांसह लंडनमध्येच स्थायिक झाले आहेत. सामन्यापूर्वी मिळालेल्या मोकळ्या वेळात तो आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी गेल्याचे बोलले जात आहे. (Virat Kohli)
https://prahaar.in/2026/07/18/pune-jagannath-rath-yatra-2026-attention-pune-residents-traffic-diversions-on-key-roads-tomorrow-due-to-the-jagannath-rath-yatra-check-your-route-before-stepping-out/
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत विराटने दोन सामन्यात ६५ धावा केल्या आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर कार्डिफ येथे झालेल्या दुसर्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत ६५ धावांची खेळी केली होती. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आले नाही. शेवटच्या सामन्यात विराट कोहलीकडने मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराटला या मालिकेनंतर मोठा ब्रेक मिळणार आहे. तो आता थेट २७ सप्टेंबरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एतदिवसीय मालिकेत खेळताना दिसेल. (IND vs ENG)