Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे देवदर्शन आटोपून नाशिककडे परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या कारचा धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (Dhule Mumbai Agra Highway accident)
https://prahaar.in/2026/07/18/wont-join-the-nda-jayant-patil/
दुभाजक तोडून कार ट्रकवर आदळली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक येथील एक कुटुंब इनोव्हा कारने अजमेरला देवदर्शनासाठी गेले होते. देवाचे दर्शन झाले , फिरणं झालं मात्र परतीच्या प्रवासात काळ आडवा आला. दर्शन घेऊन परतत असताना शिरपूर फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली ही कार वेगाच्या भरात थेट महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर घुसली आणि समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला अत्यंत वेगाने जाऊन धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की, यामध्ये इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. स्थानिकांनी आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढत तात्काळ मदतकार्य राबवले. (Dhule Mumbai Agra Highway accident)
https://prahaar.in/2026/07/18/pune-jagannath-rath-yatra-2026-attention-pune-residents-traffic-diversions-on-key-roads-tomorrow-due-to-the-jagannath-rath-yatra-check-your-route-before-stepping-out/
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, अपघातातील सर्व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. देवदर्शनाहून आनंदाने घरी परतणाऱ्या नाशिकच्या या कुटुंबावर वाटेतच काळाने असा भयंकर घाला घातल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dhule Mumbai Agra Highway accident)
अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र
दरम्यान, धर्माच्या नावाखाली आणि चमत्काराचा खोटा आव दाखवत निष्पाप भक्तांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात विरोधात तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आली या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. आरोपपत्रात भोंदू खरातच्या आजवरच्या काळ्या कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तब्बल 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/07/18/pune-suicide-news-pune-shaken-17-year-old-girl-takes-drastic-step-plunges-from-fifth-floor/
ईडीने जप्त केलेली मालमत्ता
– रोख रक्कम : १३.९२ कोटी रुपये
– विदेशी चलन : ५.१८ लाख रुपये
– सोने-चांदीचे दागिने : १.१२ कोटी रुपये
– बँक ठेवी : २.६० कोटी रुपये
– वाहने : आलिशान मर्सिडीझ-बेंझ कार
– एकूण चल मालमत्ता : १७.७० कोटी रुपये
– तात्पुरती जप्त स्थावर मालमत्ता : १९.२० कोटी रुपये