भारतीय क्रिकेटमधील युवा सनसनाटी आणि आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याला श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या तिरंगा मालिकेत पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. सलग दुसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. पहिल्या सामन्यात अवघ्या १४ धावांवर बाद झालेल्या वैभवने यावेळी २१ धावांची खेळी केली, मात्र त्याची खेळी पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली नाही. (Vaibhav Sooryavanshi)
https://prahaar.in/2026/06/15/major-action-by-fssai-staple-pins-and-metal-wires-in-food-packaging-banned-penalties-for-violations/
भारत ‘अ’ संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात सावध खेळ केल्यानंतर दुसऱ्या षटकात वैभवने आक्रमक फटकेबाजी करत एका षटकातच १७ धावा चोपल्या. त्याने चौकार, षटकार आणि पुन्हा चौकार लगावत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. (Vaibhav Sooryavanshi)
https://prahaar.in/2026/06/14/deepti-sharma-brilliant-performance-indian-women-resounding-victory-over-pakistan-women-in-the-world-cup-match/
तिरंगा मालिकेत आतापर्यंत वैभव सूर्यवंशीला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने मालिकेत एकूण ७९ धावा केल्या असून त्यामध्ये १५ चौकार आणि केवळ १ षटकाराचा समावेश आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना वैभवला मात्र सातत्य राखण्यात अपयश येत आहे. आता मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी आपल्या फलंदाजीतील त्रुटी दूर करून मोठी खेळी करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Vaibhav Sooryavanshi)
🔴 ANOTHER FAILURE FOR VAIBHAV SURYAVANSHI IN ODI FORMAT 🤯
14 (12) vs SL
44 (22) vs AFG
21 (14) vs SLHe needs to have patience and learn to play grounded shots; otherwise, he won’t survive in the longer formats. 💔 pic.twitter.com/Ho79FNHolY
— Sam (@cricsam02) June 15, 2026