Home साप्ताहिक अर्थविश्व Share Market News : अमेरिका-इराण शांतता कराराचा बाजारावर जादुई परिणाम! सेन्सेक्स ११०० अंकांनी उसळला, निफ्टीने पुन्हा गाठला २४ हजारांचा टप्पा

Share Market News : अमेरिका-इराण शांतता कराराचा बाजारावर जादुई परिणाम! सेन्सेक्स ११०० अंकांनी उसळला, निफ्टीने पुन्हा गाठला २४ हजारांचा टप्पा

0
Share Market News : अमेरिका-इराण शांतता कराराचा बाजारावर जादुई परिणाम! सेन्सेक्स ११०० अंकांनी उसळला, निफ्टीने पुन्हा गाठला २४ हजारांचा टप्पा
share market

मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक शांतता करारानंतर जागतिक बाजारातील अनिश्चिततेला मोठा ब्रेक लागला असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी करत बाजाराला दमदार उंचीवर नेले. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मोठी झेप घेतली, तर रुपयानेही डॉलरसमोर मजबुती दाखवली. (Share Market News)

सोमवारी बाजार उघडताच बीएसईचा सेन्सेक्स तब्बल १,१२६.३६ अंकांनी म्हणजे १.४९ टक्क्यांनी वधारून ७६,६५४.३१ या पातळीवर पोहोचला. तर एनएसईचा निफ्टी ३३९.२५ अंकांच्या वाढीसह २३,९६२.१५ वर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीने २४,००० अंकांचा महत्त्वाचा टप्पा पुन्हा ओलांडल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (Share Market News)

बाजारातील तेजीचा अंदाज यावरून येतो की, सुरुवातीच्या सत्रात सुमारे ५५७ शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते, तर केवळ ६५ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. उर्वरित काही शेअर्स स्थिर राहिले. यामुळे बाजारातील सकारात्मक भावना अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले. निफ्टीवरील सर्वाधिक तेजीत असलेल्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि TMPV यांचा समावेश होता. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने त्यांचे भाव झपाट्याने वाढले. (Share Market News)

https://prahaar.in/2026/06/15/mumbai-pune-in-just-48-minutes-plans-underway-to-build-7-high-speed-rail-corridors-in-the-country/

मात्र, सर्वच शेअर्स तेजीत नव्हते. ओएनजीसी, सिप्ला आणि अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली. ऊर्जा क्षेत्रातील काही शेअर्सवर कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीचा परिणाम झाल्याचे मानले जात आहे. बँकिंग क्षेत्रातही मजबूत कामगिरी पाहायला मिळाली. बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएससारखे हेवीवेट शेअर्सही हिरव्या निशाणीत व्यवहार करत होते. (Share Market News)

https://prahaar.in/2026/06/15/raid-on-illegal-mixed-hydrocarbon-oil-stock-in-thane-contraband-worth-%e2%82%b91-20-crore-seized/

दरम्यान, जागतिक घडामोडींचा सकारात्मक परिणाम चलन बाजारावरही दिसून आला. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ५२ पैशांनी मजबूत होत ९४.५७ प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला. त्यामुळे आयात खर्चात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका-इराण करारामुळे भू-राजकीय तणाव कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून, त्याचा थेट फायदा भारतीय बाजाराला झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Share Market News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here