नवी दिल्ली : पाश्चात्य देशांचे भू-राजकीय दबाव आणि निर्बंध झुगारून भारताने रशियाकडून जीवाश्म इंधनाची मोठी खरेदी सुरूच ठेवली आहे. युरोपियन थिंक टँक 'सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर'च्या ताज्या अहवालानुसार, मे २०२६ मध्ये भारत रशियाकडून जीवाश्म इंधन आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे. भारताने या एकाच महिन्यात रशियाकडून अंदाजे ५.८ अब्ज युरो (सुमारे ६.७ अब्ज डॉलर) किमतीचे हायड्रोकार्बन आयात केले आहेत.
या एकूण आयातीमध्ये कच्च्या तेलाचा वाटा सर्वाधिक म्हणजे ८३ टक्के (४.८ अब्ज युरो) होता. याव्यतिरिक्त, ५५० दशलक्ष युरोची तेल उत्पादने आणि ४२९ दशलक्ष युरो किमतीच्या कोळशाची आयात करण्यात आली. अहवालानुसार, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील तेलाची खरेदी वाढवल्यामुळे, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताच्या या वाढीव आयातीमागे रशियाकडून होणाऱ्या पुरवठ्यातील २१ टक्क्यांची वाढ हे मुख्य कारण आहे.(Raigad Accident)
नवी दिल्ली : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने ३२ सदस्यीय ...
रशियन तेलाची आवक वाढली
एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात गुजरातच्या 'वडीनार रिफायनरी'मध्ये रशियन तेलाचे अनलोडिंग ३६ टक्क्यांनी वाढले, तर 'जामनगर रिफायनिंग कॉम्प्लेक्स'मध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांनी वाढले. नोव्हेंबर २०२५ मध्ये रशियन तेलाची आयात थांबवणाऱ्या 'न्यू मंगळूर' आणि 'विशाखापट्टणम' या सरकारी रिफायनरींनी मार्च २०२६ पासून पुन्हा खरेदी सुरू केली आहे. मे महिन्यात न्यू मंगळूर रिफायनरीच्या आवकेत १३ टक्के, तर विशाखापट्टणम रिफायनरीच्या आवकेत ४२ टक्क्यांची मोठी वाढ झाली. ओडिशातील 'पारादीप रिफायनरी'ने मे २०२६ मध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक रशियन कच्च्या तेलाची आयात करून नवा उच्चांक गाठला.
चीन अव्वल स्थानावर
जागतिक पातळीवर रशियाच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी सर्वाधिक ५० टक्के खरेदी चीनने केली आहे, तर ३६ टक्क्यांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तुर्की ६ टक्क्यांसह तिसऱ्या आणि युरोपियन युनियन ५ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मे २०२६ मध्ये रशियाला सर्वाधिक महसूल चीनकडून मिळाला. रशियाच्या पहिल्या पाच आयातदार देशांकडून मिळालेल्या एकूण महसुलात चीनचा वाटा ३८ टक्के (सुमारे ७ अब्ज युरो) होता. चीनच्या या आयातीत कच्चे तेल, पाईपलाईन गॅस, कोळसा आणि एलएनजीचा समावेश होता.
देहरादून : सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मधील ऐतिहासिक निर्णयामुळे नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये (एनडीए) महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. यानुसार, ...
जामनगर रिफायनरीतून अमेरिकेला पुरवठा
अहवालानुसार, यापैकी अंदाजे २१४ दशलक्ष युरो किमतीची उत्पादने थेट रशियन कच्च्या तेलावर प्रक्रिया करून बनवण्यात आली होती. अमेरिकेला जाणारे हे इंधन प्रामुख्याने भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरी आणि तुर्कीच्या स्टार व तुप्रास इझमिट रिफायनरीमधून पाठवले गेले. गेल्या तीन महिन्यांत जामनगर रिफायनरीच्या एकूण कच्च्या तेलाच्या फीडस्टॉक पैकी १५ टक्के फीडस्टॉक रशियामधून आला होता, असेही सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरने स्पष्ट केले आहे.
Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे. राज्यात मान्सून पोहोचला असला तरी ...
निर्बंध असूनही रशियन तेल युरोप आणि अमेरिकेत!
युरोपियन युनियनने २१ जानेवारी २०२६ पासून रशियन तेल उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे. असे असूनही, रशियन कच्च्या तेलाचा वापर करणाऱ्या इतर देशांतील रिफायनरींमधून तेल उत्पादनांच्या १० मोठ्या खेपा मे महिन्यात युरोपियन बंदरांवर दाखल झाल्या आहेत. इराण, तुर्की, ब्रुनेई आणि भारत यांसारख्या देशांमधून मे २०२६ मध्ये पाश्चात्य देशांना ६४१ दशलक्ष युरो किमतीची तेल उत्पादने निर्यात करण्यात आली. यामध्ये रशियन तेलावर प्रक्रिया करून तयार केलेले इंधन खरेदी करणाऱ्या देशांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
ऑस्ट्रेलिया: २७५ दशलक्ष युरो युरोपियन युनियन: १७४ दशलक्ष युरो अमेरिका: १४७ दशलक्ष युरो न्यूझीलंड: ४५ दशलक्ष युरो




