वाशिमच्या तिवळी गावात एक भयंकर घटना समोर अली आहे. बापाने आपल्या दोन पोटच्या मुलांसह बायकोचे हात बांधून विहिरीत ढकलले. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तिवळी गाव हळहळलं.
https://prahaar.in/2026/06/14/sexual-assault-on-minor-girl-girl-pregnant-three-arrested/
वाशिमच्या तिवळी गावात एक कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. संतोष बकाल (35वर्ष) तो आपली पत्नी इंद्रायणी बकाल (28वर्ष) मुलगी जान्हवी बकाल (7वर्ष) आणि मुलगा सोहम बकाल (५ वर्ष) त्यांच्यासह तिवळी गावात राहत होत. खूप दिवसापासून पती आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. कौटुंबिक वादामुळे संतोष बकालने इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधून त्यांना विहिरीत ढकलले आणि नंतर स्वतः महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणले .
https://prahaar.in/2026/06/14/pune-railway-block-important-news-for-pune-railway-passengers-9-hour-mega-block-many-trains-cancelled-major-changes-to-the-schedule/
एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे असा संशय इंद्रायणीच्या भावाला आणि नातेवाईकांना आहे. संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्याच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली असली तरी पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं काय घडलं यावर भाष्य करणार असल्याचं सांगितलं. पुढील तपास सुरू आहे आणि चौकशीसाठी संतोषचा भाऊ याला ताब्यात घेतलं आहे.