Home ब्रेकिंग न्यूज ‘Killer’ Film Set Accident : ‘किलर’ चित्रपटाच्या सेटवर भीषण स्फोट; २६ वर्षीय टेक्निशिअनचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

‘Killer’ Film Set Accident : ‘किलर’ चित्रपटाच्या सेटवर भीषण स्फोट; २६ वर्षीय टेक्निशिअनचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

0
‘Killer’ Film Set Accident : ‘किलर’ चित्रपटाच्या सेटवर भीषण स्फोट; २६ वर्षीय टेक्निशिअनचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
Killer Movie Accident

चेन्नई : ॲक्शन चित्रपटांमधील (Action Films) थरारक दृश्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी त्यामागील मेहनत आणि धोके अनेकदा समोर येत नाहीत. अशाच एका दुर्दैवी घटनेने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हादरली आहे. अभिनेता-दिग्दर्शक एस. जे. सूर्या यांच्या आगामी ‘किलर’ (Killer) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या भीषण स्फोटात एका टेक्निशिअनचा (Technician) मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, ३ जून रोजी चेन्नईतील पेरम्बूर येथील बिन्नी मिल्स कॉम्प्लेक्समध्ये चित्रपटाचे शूटिंग (Shooting) सुरू होते. एका मोठ्या स्फोटाच्या ॲक्शन सीनचे (Action Scene) चित्रीकरण करण्यात येत होते. या दृश्यासाठी स्पेशल इफेक्ट्समध्ये गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला होता. मात्र, शूटिंग सुरू असताना अचानक सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि सेटवर एकच गोंधळ उडाला.

https://prahaar.in/2026/06/04/sant-tukaram-maharaj-palkhi-ceremony-schedule-announced-departure-from-dehu-to-pandharpur-on-july-7/

या दुर्घटनेत स्पेशल इफेक्ट्स (Special Effects) विभागातील चार टेक्निशिअन गंभीररीत्या भाजले गेले. जखमींमध्ये २६ वर्षीय मदन, २७ वर्षीय शक्तीवेल, २३ वर्षीय सूर्या आणि २४ वर्षीय दिनकरन यांचा समावेश आहे. सर्वांना तातडीने राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मदन यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. शूटिंगदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच तांत्रिक निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here