पुणे : दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणात (Pune Toxic Liquor Case) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मोठी कारवाई करत दारूमध्ये विषारी रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य संशयित पिता-पुत्राला अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून संपूर्ण पुरवठा साखळी उघडकीस आणण्याच्या दिशेने तपास यंत्रणा वेगाने पावले टाकत आहे.
https://prahaar.in/2026/06/04/renowned-producer-pahlaj-nihalani-passes-away-hindi-film-industry-plunged-into-mourning/
नेमकं प्रकरण काय ?
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी विषारी हातभट्टीची दारू सेवन (Pune Toxic Liquor Case) केल्यानंतर भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मृतांच्या कुटुंबीयांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत असताना सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता.
जप्त करण्यात आलेले दारूचे नमुने आणि रासायनिक पदार्थ न्यायवैद्यक तपासणीसाठी पुण्यातील फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात दारूमध्ये जीवघेणे रासायनिक घटक मिसळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याबाबतचा अंतिम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. (Pune Toxic Liquor Case)
https://prahaar.in/2026/06/04/navanth-ban-this-is-not-an-election-for-the-housewives-but-for-the-workers/
सीआयडी आता या प्रकरणातील संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहे. विषारी रसायनांचा मूळ स्रोत, त्यांची खरेदी-विक्री, वाहतूक आणि हातभट्टी दारू निर्मात्यांपर्यंत पोहोचण्याची साखळी याचा तपास सुरू आहे. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. (Pune Toxic Liquor Case)