Home ताज्या घडामोडी Sangli : वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचारी कडे केली शरीर सुखाची मागणी . . .

Sangli : वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचारी कडे केली शरीर सुखाची मागणी . . .

0
Sangli : वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचारी कडे केली शरीर सुखाची मागणी  . . .
sangali crime

सांगली : सांगली विभागीय एसटी महामंडळाच्या कार्यालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे.या कार्यालयात काम करणाऱ्या एका वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती.

https://prahaar.in/2026/06/01/mumbai-police-video-commendable-act-by-mumbai-police-woman-attempting-suicide-rescued-video-goes-viral/

सांगलीतील एसटी महामंडळ विभागीय कार्यालयात तोंडाला काळीमा फासणारा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे.या कार्यालयात एक महिला काम करत होती वरिष्ठ लिपिका कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तिने पोलिसात तक्रार केल्या वर सर्व प्रकार उघडीस आला .वरिष्ठ लिपिक महिला कर्मचारीला रोज काम करत असताना विचित्र आणि घाणेरड्या नजरेने पाहात असे सुरुवातीला तिने दुर्लक्षित केलं सर्व सहन करत राहिली परंतु दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. त्या वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. या संबंधित प्रकरणी महिलेने महामंडळाकडे सविस्तर तक्रार केली होती.पण त्याच्या वर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून महिला कर्मचारीचा राग अनावर झाला आणि तिने वरिष्ठ लिपिका ला चांगलाच चोप दिला. या घटनेत नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

https://prahaar.in/2026/06/01/why-confess-to-killing-shivani-why-go-to-jail-for-21-days-father-bapurav-karmekar-strange-answer-after-out-of-jail-buldhana/

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,वरिष्ठ लिपिक त्या महिलेला खूप दिवसा पासून सतत त्रास देत होता त्या मुले तिला मानसिक त्रास खूप होत होता . त्या नराधमाने तिच्या कडे शरीर सुखाची मागणी केली असा आरोप पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी केला . आणि हा विशेष म्हणजे या त्रासाची तक्रार पीडित महिलेने दोनदा एसटी महामंडळ ला कडे केली परंतु तो मोठ्या पदावर असल्या मुले त्याच्या वर कोणती कारवाई नाही केली . झालेल्या त्रासांना कंटाळून पीडित महिलेने सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सांगितला

https://prahaar.in/2026/06/01/7-year-old-girl-goes-missing-from-diva-thane-police-succeed-after-36-hours-of-efforts/

सर्व प्रकरण कुटुंबियांना समजल्या वर त्यांनी एसटी महामंडळ विभागीय कार्यालयात जाऊन त्या वरिष्ठ लिपिक बेदम मारहाण केली आणि त्याची सांगली पोलीस ठाण्यात तक्रार केली . सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांनी वरिष्ठ लिपिक ला ताब्यात घेतलं. परंतु त्याच्या वर पुढे आता काय कारवाई होणार त्याच्या कडे सर्वांचं लक्ष आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here