Home ब्रेकिंग न्यूज Pune International Airport : ‘बॉम्ब’ची चिठ्ठी अन् पुणे विमानतळावर खळबळ! उड्डाणापूर्वी विमान रिकामं, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Pune International Airport : ‘बॉम्ब’ची चिठ्ठी अन् पुणे विमानतळावर खळबळ! उड्डाणापूर्वी विमान रिकामं, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

0
Pune International Airport : ‘बॉम्ब’ची चिठ्ठी अन् पुणे विमानतळावर खळबळ! उड्डाणापूर्वी विमान रिकामं, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
Pune International Airport

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडल्याने काही काळासाठी खळबळ उडाली. पुणे-गुवाहाटी विमानाच्या टॉयलेटमध्ये ‘बॉम्ब’ असा उल्लेख असलेली संशयास्पद चिठ्ठी आढळल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. या घटनेमुळे विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Pune International Airport)

टॉयलेटमध्ये सापडली संशयास्पद चिठ्ठी :

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजता गुवाहाटीकडे रवाना होणाऱ्या विमानात उड्डाणापूर्वी नियमित सुरक्षा तपासणी सुरू होती. सकाळी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान एअर होस्टेसने विमानातील स्वच्छतागृहाची पाहणी केली असता तिला एक चिठ्ठी आढळली. त्या चिठ्ठीवर ठळक अक्षरात ‘बॉम्ब’ असा शब्द लिहिलेला होता. ही बाब लक्षात येताच एअर होस्टेसने तत्काळ पायलट आणि विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली. कोणताही धोका पत्करायचा नाही, या भूमिकेतून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केली. (Pune International Airport)

https://prahaar.in/2026/05/31/bhimashankar-temple-open-for-darshan-from-june-15-online-pass-mandatory-know-the-new-rules/

विमान निर्जन भागात हलवले, सर्व प्रवाशांना खाली उतरवले :

सुरक्षा नियमांनुसार संबंधित विमानाला धावपट्टीवरील सुरक्षित आणि निर्जन भागात नेण्यात आले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरले होते, तर काहींनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक, सीआयएसएफ, विमानतळ सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे तपास मोहीम हाती घेतली. (Pune International Airport)

एक तास कसून तपासणी; मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही :

संपूर्ण विमान, सामान ठेवण्याची जागा, प्रवाशांचे बॅगेज आणि विमानातील प्रत्येक भागाची सखोल तपासणी करण्यात आली. जवळपास एक तास चाललेल्या या तपासादरम्यान कोणताही बॉम्ब, स्फोटक पदार्थ किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर ही केवळ खोटी धमकी असल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा यंत्रणांनी विमान पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर प्रवाशांना पुन्हा विमानात प्रवेश देण्यात आला आणि विमान गुवाहाटीकडे रवाना करण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमुळे उड्डाणाला काही काळ विलंब झाला. (Pune International Airport)

https://prahaar.in/2026/05/31/no-relief-for-nida-khan-hearing-on-bail-application-on-june-12/

खोडसाळपणा की मोठ्या कटाचा भाग?

या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही चिठ्ठी कोणी ठेवली, त्यामागे नेमका उद्देश काय होता आणि हा प्रकार केवळ खोडसाळपणातून करण्यात आला की त्यामागे कोणता मोठा कट आहे, याचा तपास सुरू आहे. (Pune International Airport)

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू :

पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून विमानात प्रवेश केलेल्या प्रत्येक प्रवाशाची माहिती पडताळली जात आहे. संबंधित चिठ्ठी ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासासह विविध पथके कामाला लागली आहेत. (Pune International Airport)

https://prahaar.in/2026/05/31/bait-of-marriage-forced-conversion-and-inhuman-beating-a-shocking-incident-happened-to-a-hindu-girl-in-mira-road/

विमानतळ सुरक्षेचा पुन्हा एकदा कस :

देशातील विमानतळांवर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठोर नियम लागू असतानाही अशा प्रकारच्या धमकीच्या घटना वेळोवेळी समोर येत असतात. जरी या प्रकरणात कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नसला तरी एका छोट्याशा चिठ्ठीमुळे संपूर्ण विमानतळ यंत्रणा सतर्क झाली आणि उड्डाण प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे अशा प्रकारच्या खोडसाळ कृत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. (Pune International Airport)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here