जगातील नंबर-1 जोडीचा केला पराभव
भारताची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. या जोडीने आता अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारतीय जोडीने जगातील अव्वल मानांकित दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि सियो सेउंग जे या जोडीचा 21-19, 21-18 अशा सरळ गेममध्ये पराभव केला आहे.
जगातील नंबर-1 जोडीविरुद्ध ऐतिहासिक विजय
52 मिनिटे रंगलेल्या या रोमांचक सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी संयम, आक्रमकता आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरित धडक मारली आहे. विशेष म्हणजे, किम-सियो या जोडीविरुद्ध भारतीय जोडीचा हा पहिलाच विजय ठरला आहे. त्यामुळे या यशाला अधिक महत्त्वाचा मानलं जात आहे. पहिल्या गेममध्ये कोरियन जोडीने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मध्यंतरावेळी ते 13-11 ने पुढे होते. मात्र, सात्विक-चिराग यांनी दबाव झुगारून सलग गुणांची कमाई करत सामना आपल्या बाजूने फिरवला आणि पहिला गेम 21-19 ने जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय जोडी 11-14 अशा पिछाडीवर होती. पण त्यानंतर दोघांनी अप्रतिम खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमनाची संधीच दिली नाही. सलग गुण मिळवत त्यांनी दुसरा गेम 21-18 ने जिंकला आणि अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.
https://prahaar.in/2026/05/31/ipl-2026-final-the-epic-battle-will-be-played-in-ahmedabad-today-rcb-or-gujarat-both-teams-are-ready-for-the-second-title/
आता विजेतेपदापासून एक पाऊल दूर…
रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात सात्विक-चिराग यांचा सामना इंडोनेशियाच्या फजर अल्फियान-मुहम्मद शोहिबुल फिकरी किंवा चीनच्या लियांग वेई कांग-चांग वांग या जोड्यांपैकी एका विजेत्या जोडीशी होणार आहे. भारतीय चाहत्यांच्या नजरा आता या अंतिम सामन्याकडे लागले आहे.
India’s Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty win men’s doubles title at Singapore Open Badminton, their first BWF triumph in two years.
Congratulation Champs 💪🇮🇳🏅 pic.twitter.com/b1zgeHsg0s
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 31, 2026
भारताला सुवर्णाचीपदकाची आशा
सात्विक-चिराग यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताच्या विजेतेपदाच्या आशा अधिक वाढल्या आहेत. जगातील अव्वल जोडीला पराभूत केल्यानंतर आता ही भारतीय जोडी सिंगापूर ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचणार का, याकडे सर्व क्रिडाचाहत्यांचे लक्ष लागले आहे.