Home ताज्या घडामोडी Ranveer Singh : रणवीर-फरहानच्या वादात आता सलमान खानचा प्रवेश, आता ‘भाईजान’ काढणार का यावर तोडगा ?

Ranveer Singh : रणवीर-फरहानच्या वादात आता सलमान खानचा प्रवेश, आता ‘भाईजान’ काढणार का यावर तोडगा ?

Ranveer Singh : रणवीर-फरहानच्या वादात आता सलमान खानचा प्रवेश, आता ‘भाईजान’ काढणार का यावर तोडगा ?
ranveer salman farhaan

अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि फरहान अख्तर(Farhaan Akhtar) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आता सलमान खानने पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी सलमान खानने(Salman Khan) दोघांशीही चर्चा केली असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन 3’(Don 3) या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) अभिनेता रणवीर सिंह विरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केले. यावरून रणवीरच्या चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूड(Bollywood) इंडस्ट्रीत एकच चर्चा सुरू आहे की, हा वाद कसा मिटवला जाणार? अशातच या वादात आता बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान याचा प्रवेश झाला आहे. रणवीर आणि फरहान यांच्यातील हा वाद सोडवण्यासाठी सलमान खान मध्यस्थी करणार असल्याचं बोल्ल जात आहे. सलमान खानला फिल्म इंडस्ट्रीचा ‘गॉडफादर’ असं म्हटलं जातं. कारण तो नेहमीच कठीण काळात लोकांच्या पाठिशी उभा राहतो.

https://prahaar.in/2026/05/28/bashir-badr-famous-poet-dr-bashir-badr-passes-away-an-era-of-poetry-has-ended/

‘डॉन 3’वरून रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात वाढता वाद पाहून सलमान खानने मध्यस्थी करण्याच ठरवलं आहे. सलमान खानला रणवीर सिंह एक अभिनेता आणि व्यक्ती म्हणून खूप आवडतो. तर अख्तर कुटुंबाशीही त्याचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. त्याने दोन्ही पक्षांशी संवाद साधला असून आपापल्या भविष्याच्या प्रकल्पाना धक्का न लावता आपले प्रश्न सोडवण्याचे आवाहन केलं आहे.

https://prahaar.in/2026/05/28/salman-khan-special-gift-from-salman-khan-to-fans-heartwarming-song-from-upcoming-film-released/

यावेळी सलमान खानने फरहानला समजावून सांगितलं की, इंडस्ट्रीत अनेक दशकांपासून क्रिएटिव्ह मतभेद असणं ही एक सामान्य गोष्ट आहे. रणवीरचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी त्याने त्याच्याशीही बराच वेळ चर्चा केली. या संपूर्ण प्रक्रियेत कोणालाही दुखावलं जाऊ नये यासाठी त्याने समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने दोन्ही पक्षांना हा वाद मिटल्यानंतर एक इंडस्ट्री म्हणून विचार करून दुसऱ्या प्रकल्पावर एकत्र काम करण्यास सांगितलं आहे.

https://prahaar.in/2026/05/28/i-cant-dance-netizens-give-hilarious-reactions-to-shraddhas-viral-dance-video/

फरहान आणि रणवीर या दोघांनीही सलमान खानची मतं समजून घेतली आहेत आणि त्याचा सल्ला गांभीर्याने घेतला आहे. आता ते कोणताही पुढील वाद न होऊ देता समंजस्यपूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सलमान खानला या प्रकरणात कोणतीही कायदेशीर गुंतागुंत नको आहे. तसंच चित्रपट एजन्सींनीही घाईने निर्णय घ्यावेत असही त्याला वाटत नाही. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सलमान खान फरहानच्या पाठिशी उभा आहे आणि ‘धुरंधर’च्या यशाचा फायदा घेण्यासाठी रणवीरला नवीन प्रोजेक्ट करण्यास प्रोत्साहनही देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here