Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadnavis : पुणे विषारी दारू प्रकरणातील एकाही आरोपीला सोडू नका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

Devendra Fadnavis : पुणे विषारी दारू प्रकरणातील एकाही आरोपीला सोडू नका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

0
Devendra Fadnavis : पुणे विषारी दारू प्रकरणातील एकाही आरोपीला सोडू नका!  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश
Chief Minister Devendra Fadnavis

मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेत आतापर्यंत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही शहरांत भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून या प्रकरणातील एकाही दोषीला सोडू नका आणि आरोपींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले आहेत.

कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, “मी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दोन्ही पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. दोन्ही आयुक्तांनी आपसात योग्य समन्वय ठेवून काम करावे आणि मृत्यूच्या नेमक्या कारणांचा तात्काळ शोध घ्यावा,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/05/29/former-minister-prajakta-tanpure-to-join-bjp-tomorrow/

राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच संपूर्ण यंत्रणा कामाला लावून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने व्हावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क (अबकारी) विभागही पोलिसांच्या सोबतीने मैदानात उतरला असून, संशयित ठिकाणांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सुत्रधार कर्नल विरखा सिंग याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्यासह इतर ८ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व ९ आरोपींवर कायद्यातील अत्यंत कठोर कलमांअंर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले असून, या बेकायदेशीर व्यवसायाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी रात्रीतूनच मोठी मोहीम हाती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here