– ३० जूनआधी योजनेची अंमलबजावणी होणार
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीला आचारसंहितेतून विशेष सूट दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ही महत्त्वाकांक्षी कर्जमाफी आता ३० जूनपूर्वीच पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मिळालेल्या या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Farmer Loan Waiver)
https://prahaar.in/2026/05/26/bakri-eid-2026-tension-in-mira-road-before-bakri-eid-dispute-over-keeping-goats-in-society-direct-blade-attack-on-youth/
सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. तर दुसरीकडे, बँकेचे कर्ज प्रामाणिकपणे आणि नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही सरकारने सन्मान केला आहे. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. (Farmer Loan Waiver)
https://prahaar.in/2026/05/26/cng-price-hike-after-petrol-diesel-now-cng-is-also-expensive-price-hike-for-the-fourth-time-in-15-days-know-todays-prices/
३० जूनपूर्वी अंमलबजावणी होणार :
– शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ३० जूनपूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (डीबीटीद्वारे) वर्ग केली जाईल. खरीप हंगामाची कामे सुरू असतानाच हा निधी हाती येणार असल्याने शेतकऱ्यांची पैशांची नड भागणार आहे.
– गेल्या काही वर्षांत राज्यातील शेती क्षेत्र सातत्याने अस्मानी संकटांचा सामना करत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी अतिवृष्टी आणि त्यातच वाढलेला उत्पादन खर्च यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय आणि आता त्याला मिळालेली निवडणूक आयोगाची मंजुरी ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार आहे.