Monday, May 25, 2026

Maharashtra Vidhan parishad Elections 2026 : महायुतीत जागावाटपावरून खळबळ! शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Maharashtra Vidhan parishad Elections 2026 : महायुतीत जागावाटपावरून खळबळ! शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या हालचालींना वेग

मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठी राजकीय घडामोड सुरू झाली आहे. काही जागांवर सहमती झाली असली तरी महत्त्वाच्या जागांवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची माहिती समोर येत असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने हालचालींना वेग दिला आहे. (Maharashtra Vidhan parishad Elections 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत विधान परिषद जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उपस्थित होते. (Maharashtra Vidhan parishad Elections 2026)

शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची रणनीती :

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा मुद्दा विशेष चर्चेत होता. महायुतीत समन्वय राखण्यासाठी आणि जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे दोन्ही नेते लवकरच एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Vidhan parishad Elections 2026)

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. शिवसेनेकडून सात जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून, आज रात्री पुन्हा एकदा निर्णायक बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Vidhan parishad Elections 2026)

महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदलाची शक्यता :

महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात ऐनवेळी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर लढणार अशी चर्चा होती. मात्र, नव्या समीकरणानुसार भाजप १२, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Maharashtra Vidhan parishad Elections 2026)

मात्र, अद्याप कोणत्याही फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे आज रात्री होणाऱ्या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Vidhan parishad Elections 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >