Home ताज्या घडामोडी Actor Hemant Modi : “सिरियल ची शूटिंग करताना अॅक्टर ला केली अटक !”

Actor Hemant Modi : “सिरियल ची शूटिंग करताना अॅक्टर ला केली अटक !”

0
Actor Hemant Modi : “सिरियल ची शूटिंग करताना अॅक्टर ला केली अटक !”
hemant modi

अहमदाबाद : खूनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर बाहेर आलेला आरोपी तब्बल 12 वर्षे फरार राहून अभिनेता म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबाद क्राइम ब्रांचने हेमंत मोदी या आरोपीला अखेर अटक केली. विशेष म्हणजे, तो मुंबईत ‘स्वप्निल मोदी’ या नावाने चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता. आता अहमदाबादमध्ये एका सिरीयलचे शूटिंग करताना सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

https://prahaar.in/2026/05/23/twisha-sharma-death-case-twisha-was-in-the-parlor-for-3-hours-before-her-death-police-will-search-those-60-minutes/

नेमकी प्रकरण काय ?

पोलिसांच्या माहितीनुसार, हेमंत मोदी हा वकील आहे. २००५ मध्ये अहमदाबादच्या नरोदा भागात झालेल्या एका वादानंतर नरेंद्र तांबले उर्फ नन्नो यांच्या खूनप्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात २००८ मध्ये न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

शिक्षेनंतर हेमंतला साबरमती जेलमधून मेहसाणा जेलमध्ये नेहण्यात आले . २०१४ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने त्याची ३० दिवसांची पॅरोल मंजूर केली होती. मात्र,पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी असे स्पष्ट केले की, फरार झाल्यानंतर हेमंत मुंबईला गेला. तेथे त्याने नाव बदलून ‘स्वप्निल मोदी’ असे ठेवले. त्याने आपली हेअरस्टाईल आणि राहणीमानही बदलले. त्यानंतर त्याने चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये साईड रोल करत अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

https://prahaar.in/2026/05/23/will-deul-band-fame-gashmeer-mahajani-soon-appear-before-the-audience-in-a-new-role/

क्राइम शाखेनी केलेली कारवाई :

अहमदाबाद क्राइम शाखेचे निरीक्षक पीएम धाकडा यांनी सांगितले की, आरोपी सध्या ‘मोटी बानी नानी बहू’ या मालिकेच्या शूटिंगसाठी अहमदाबादमध्ये आला होता. त्याच्याबाबत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली. अभिनेत्याला अटक करण्यासाठी गेलो असताना त्याचा अभिनय एवढा शानदार होता की त्याला ओळखणे अवघड होते. शूटिंग संपवून घरी परतत असताना त्याला अटक करण्यात आले. सुरुवातीला आरोपीने स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जुन्या अटकेवेळी नोंदवलेल्या शरीरावरील खुणांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.शेवटी त्याने आपणच हेमंत मोदी असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, अहमदाबादच्या कोट परिसरात राहत असताना त्याने घरमालकाला कोणतीही ओळखपत्रे दिली नव्हती. त्यामुळे स्थानिकांना त्याच्यावर संशय आला होता. एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर क्राइम शाखेनी कारवाई केली. दरम्यान, अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण करण्यासाठी आणि पकड टाळण्यासाठी त्याने नाव बदलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here