सोलापूर : सोलापूर शहरात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर एका टेक्स्टाईल एजंटला तब्बल ६८ लाख २६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील गुंतवणूक जाहिरातींचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. (Online Fraud)
या प्रकरणी किरण नागनाथ कोटा (वय ४९, रा. रंगराज नगर, मार्केट यार्डामागे, सोलापूर) यांनी शहर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Online Fraud)
https://prahaar.in/2026/05/23/ministers-from-all-parties-start-lobbying-for-sea-view-hall/
या ग्रुपमध्ये आर. व्यंकटरमन, टीना मल्होत्रा आणि टीना नावाचे सदस्य ॲडमिन म्हणून सक्रिय होते. त्यांनी कोटा यांच्याशी थेट संपर्क साधत ‘डीएमए’ म्हणजेच डायरेक्ट मार्केट ॲक्सेस अकाउंटद्वारे शेअर बाजारात ट्रेडिंग करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही व्यवहारांमध्ये नफा दाखवून त्यांचा विश्वास जिंकण्यात आला. (Online Fraud)
https://prahaar.in/2026/05/23/sudden-30-percent-increase-in-fuel-demand-in-the-state/
सायबर गुन्हेगारांनी बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, खोटे स्क्रीनशॉट आणि बनावट नफ्याचे आकडे दाखवून कोटा यांना जाळ्यात ओढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. (Online Fraud)
https://prahaar.in/2026/05/23/indian-army-cheetah-helicopter-indian-armys-cheetah-helicopter-crashes-into-mountains-3-officers-slightly-injured/
या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित आरोपी परराज्यातील किंवा आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता तपासली जात आहे. (Online Fraud)