Home ब्रेकिंग न्यूज Iran – America War : “ओमानचा समुद्र अमेरिकेसाठी स्मशानभूमी ठरेल”; इराणच्या इशाऱ्याने जगात खळबळ, पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची भीती

Iran – America War : “ओमानचा समुद्र अमेरिकेसाठी स्मशानभूमी ठरेल”; इराणच्या इशाऱ्याने जगात खळबळ, पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची भीती

0
Iran – America War : “ओमानचा समुद्र अमेरिकेसाठी स्मशानभूमी ठरेल”; इराणच्या इशाऱ्याने जगात खळबळ, पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची भीती
iran america

इराण आणि अमेरिका (Iran – America War) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. ४० दिवसांच्या युद्धविरामाची स्थिती असली तरी दोन्ही देशांमधील संघर्ष पूर्णपणे थांबलेला नाही. अशातच इराणकडून अमेरिकेला देण्यात आलेल्या तीव्र इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

इराणचे एक्सपीडियन्सी कौन्सिल सदस्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे माजी कमांडर मोहसेन रझाई (Mohsen Rezaee) यांनी अमेरिकेला थेट इशारा देत म्हटले की, “जर अमेरिकेने इराणी बंदरांवरील नौदल घेराबंदी हटवली नाही, तर ओमान समुद्र अमेरिकन सैन्यासाठी स्मशानभूमी ठरेल.” (Iran – America War)

https://prahaar.in/2026/05/18/silver-price-will-silver-become-more-expensive-price-hike-likely-after-governments-big-decision/

इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीवर बोलताना रेजाई यांनी अमेरिकेच्या (Iran – America War) कारवायांना “युद्धजन्य कृती” असे संबोधले. त्यांनी म्हटले की, इराणच्या समुद्री मार्गांवर आणि बंदरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याला प्रत्युत्तर देणे हा इराणचा अधिकार आहे. त्यांच्या या विधानानंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेजाई यांनी दावा केला की, अमेरिकेची (Iran – America War) घेराबंदी जितकी जास्त काळ कायम राहील तितका त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होईल. विशेषतः तेल वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. “हा तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक चर्चा सुरू आहेत, मात्र अमेरिकेने प्रामाणिक भूमिका घेणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही इराणला कठोर इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “इराणकडे आता फार कमी वेळ उरला आहे. त्यांनी अमेरिकेच्या शांतता प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तिथे काहीही शिल्लक राहणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी तीव्र झाल्याचे मानले जात आहे. (Iran – America War)

https://prahaar.in/2026/05/18/air-india-services-collapse-in-mumbai-stranded-passengers-outraged/

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणसमोर (Iran – America War) चर्चेसाठी पाच प्रमुख अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये संवर्धित युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करणे, केवळ एकच अणु केंद्र सुरू ठेवणे, नुकसानभरपाईची मागणी मागे घेणे, सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबवणे आणि इराणची जप्त मालमत्ता गोठवून ठेवण्याचा प्रस्ताव यांचा समावेश होता.

त्यावर आता इराणनेही (Iran – America War) स्वतःच्या पाच अटी मांडल्या आहेत. त्यामध्ये (Lebanon) लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशातील लष्करी कारवाया थांबवणे, इराणवरील आर्थिक निर्बंध हटवणे, जप्त केलेली इराणी मालमत्ता मुक्त करणे, युद्धातील नुकसानीची भरपाई देणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणच्या सार्वभौमत्वाला मान्यता देणे या मागण्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. या भागात तणाव वाढल्यास जागतिक तेल बाजार, इंधन दर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्षाकडे (Iran – America War) संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

https://prahaar.in/2026/05/18/nitesh-rane-construction-of-a-fishing-jetty-in-burundi-is-gaining-momentum-dapolis-fisheries-will-get-new-strength-minister-nitesh-rane/

राजनैतिक चर्चांद्वारे तोडगा निघणार की पुन्हा एकदा मध्यपूर्वेत युद्धाची (Iran – America War) ठिणगी पडणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. दोन्ही देशांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता जागतिक पातळीवर चिंता वाढली असून संयुक्त राष्ट्रांसह अनेक देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here