Home ब्रेकिंग न्यूज BKC Metro Accident : मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना क्रेनचा अचानक तोल गेल्याने अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीवर परिणाम

BKC Metro Accident : मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना क्रेनचा अचानक तोल गेल्याने अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीवर परिणाम

0
BKC Metro Accident : मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना क्रेनचा अचानक तोल गेल्याने अपघात;  कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीवर परिणाम
BKC Metro Accident

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात म्हणजेच बीकेसी परिसरात आज सकाळी (बुधवार, १५ एप्रिल) सकाळी मेट्रोच्या कामादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना अचानक क्रेनचा तोल गेल्याने क्रेनसह भलामोठा बीम खाली कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही कामगार किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बुधवार १५ एप्रिल रोजी सकाळी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कामादरम्यान हा अपघात झाला. बीम उचलण्याच्या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक क्रेन उलटल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मदतकार्य वेगात सुरु :

घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीए आणि एमएमआरसीची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. कोसळलेली क्रेन आणि बीम हटवण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीची मदत घेतली जात असून काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बिघाड की सुरक्षा नियमांचे उल्लंघन याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/04/15/ecosoc-india-elected-indias-dominance-in-the-united-nations-indias-election-to-the-world-committees/

अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम :

या दुर्घटनेमुळे कुर्ला आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. आयसीआयसीआय बँक बस स्टॉप सिग्नलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पर्यायी मार्ग:

कुर्ल्याकडे जाणारी वाहतूक डायमंड मार्केट गेट क्रमांक ८ मार्गे वळवण्यात आली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे/भारत नगरकडे जाण्यासाठी डायमंड मार्केट सिग्नलवरून डावे वळण घेण्याचा सल्ला. प्रशासनाने नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.