Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीदिवसभरात २१८ नव्या रुग्णांची नोंद

दिवसभरात २१८ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दिवसभरातील रुग्णसंख्या २०० पेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. डिसेंबरमध्ये २ डिसेंबर, ४ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला २०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर त्यात घट झाली होती. आता पुन्हा गेल्या दोन दिवसांत त्यात वाढ होऊन ही रुग्णसंख्या २०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी मुंबईत २१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. ३ डिसेंबरला त्यात घट होऊन १८६ रुग्णांची नोंद झाली. ४ डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन २२८ तर ५ डिसेंबरला २१९ रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊन ६ डिसेंबरला १६८ तर ७ डिसेंबरला १९१ रुग्ण आढळून आले. ८ डिसेंबरला रुग्णसंख्या पुन्हा वाढून २५० तर ९ डिसेंबरला २१८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या २०० च्या पार गेली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -