Sunday, May 19, 2024
Homeनिवडणूक २०२४राज ठाकरेंची शुक्रवारी पुण्यात प्रचारसभा

राज ठाकरेंची शुक्रवारी पुण्यात प्रचारसभा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे.

सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ पुतळ्याजवळ सायंकाळी ६ वाजता राज यांची सभा होईल. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली. भाजपचे राजेश पांडे, संदीप खर्डेकर, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, हेमंत संभूस, गणेश सातपुते, किशोर शिंदे यावेळी उपस्थित होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीवरून राज यांनी ही सभा मान्य केल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतरही राज यांच्या सभेची आवश्यकता का भासली, या प्रश्नावर भाजपचे पांडे यांनी सांगितले की, राज यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. आम्हाला कोणताही घटक दुर्लक्षित करायचा नाही. सभेदरम्यान वाहतूकीला कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे असे पांडे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -