Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची...

PM Narendra Modi : जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे केले भरभरुन कौतुक

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session of the Parliament) आज ७ वा दिवस आहे. आज ५६ राज्यसभा खासदारांच्या (Rajyasabha MP) निरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. काल पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या (Congress) आजवरच्या भ्रष्टाचारावर तसेच नाकर्तेपणावर बोट ठेवत काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, आज राज्यसभेत खासदारांना दिलेल्या निरोपाच्या भाषणात मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे भरभरुन कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल. मनमोहन सिंग यांनी जबाबदारी काय असते हे शिकवले. ते खासदारांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. मनमोहन सिंग यांचे या सभागृहात महत्त्वाचे योगदान असल्याचे ते म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले की, मला विशेषत: मनमोहनजींचे स्मरण ठेवायचे आहे. त्यांनी या सदनाला आणि देशाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले आहे. जेव्हा सभागृहामध्ये चर्चा होईल तेव्हा त्यात मनमोहन सिंग यांची नक्कीच चर्चा होईल. मनमोहन सिंग यांनी व्हील चेअरवर बसून सभागृहात मतदान केले. त्यांनी आपले कर्तव्य बजावले. मनमोहनजींनी लोकशाहीला बळ दिले.

तसेच पीएम मोदी पुढे म्हणाले की, सद्गुणी लोकांसोबत राहून आपल्यातील गुणही वाढले आहेत. नद्यांमधील पाणी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंतच ते पिण्यायोग्य राहते. पण नदी कितीही गोड असली तरी समुद्राला भेटताच ती पिण्यास अयोग्य होते. हा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे मला वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -