Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीPM Kisan Fund : पीएम किसान निधीत करणार दुप्पट वाढ!

PM Kisan Fund : पीएम किसान निधीत करणार दुप्पट वाढ!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार १८ हजार!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लोकसभा निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ सुमारे १२ योजना आणण्याची तयारी सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून वाढवून दुप्पट म्हणजेच १२ हजार रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

बुधवारी पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांसाठी ३ लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत खरीप व रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवण्याचीही योजनाही तयार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, प्रत्येक शेतकऱ्याला ५०,००० रुपये मिळत असल्याचे केंद्रीय खत व रसायनमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. १२ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. ६ लाख ३० हजार कोटी रुपये किसान सन्मान निधी, खत सबसिडी, एमएसपीमध्ये वाढ, सिंचन प्रकल्पासाठीचा निधी व अन्य मदत याद्वारे देण्यात येत आहे. देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम दिल्यास प्रत्येक शेतकऱ्याला ५२ हजार रुपयांपेक्षा जास्त होतात.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार लवकरच एक योजना आणणार असून, यात त्यांना सबसिडी देण्याची व्यवस्था असेल.

सध्याची युरिया सबसिडी योजना मार्च २०२५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या योजनेत युरिया सबसिडीवर ३.७० लाख कोटी रुपये इतका खर्च होणार असल्याचे मांडविया यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला १८ हजार मिळणार

दिवाळीत किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम दुप्पट म्हणजेच १२ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारनेही वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा यापूर्वीच केल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार रुपये येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -