Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीटेक्सासमध्ये एअर शो दरम्यान विमानांची धडक; पायलटसह ६ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

टेक्सासमध्ये एअर शो दरम्यान विमानांची धडक; पायलटसह ६ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

टेक्सास : अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या डॅलस शहरात एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. एअर शोदरम्यान दोन विमानांची आकाशात जोरदार धडक झाली. या दुर्धटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डॅलसमधील दुसऱ्या महायुद्धाच्या स्मरणार्थ एअर शोमध्ये दोन विंटेज लष्करी विमाने आकाशात एकमेकांवर आदळली. फेडरल अधिकार्‍यांनी सांगितले की, ही लष्करी विमाने स्फोट होण्यापूर्वी जमिनीवर कोसळली. ६ जणांचा मृत्यु झाला आहे.

शनिवारी दुपारी झालेल्या या घटनेत महायुद्धाच्या काळातील बोईंग बी-१७ फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बर आणि बेल पी-६३ किंगकोब्रा फायटर हे डॅलस कार्यकारी विमानतळावरील डॅलस एअरशोवर विंग्सवर उड्डाण करत होते, असे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने सांगितले.

विमाने हवेत असताना अचानक ती एकमेकांवर आदळली त्यानंतर खाली पडली आणि मोठा स्फोट झाला. दरम्यान आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. दरम्यान घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन विमाने जमिनीवर एकमेकावर आदळताना आणि खाली पडून पेट घेताना दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -