Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाIPL 2024PBKS vs MI: मुंबईचा ९ धावांनी रोमहर्षक विजय, पंजाबला त्यांच्यात घरात हरवले

PBKS vs MI: मुंबईचा ९ धावांनी रोमहर्षक विजय, पंजाबला त्यांच्यात घरात हरवले

मुंबई: मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सला ९ धावांनी हरवले. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या जबरदस्त अर्धशतकामुळे मुंबईला मोठा स्कोर गाठता आला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरूवात खराब झाली.

कारण जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्जीने आपल्या स्पेलमध्ये घातक गोलंदाजी करताना पंजाबचा स्कोर ४ बाद १४ असा केला होता. शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाची पहिली फळी पूर्णपणे कोसळली होती. जसप्रीत बुमराहने सामन्यात ३ विकेट घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

पंजाबकडून सर्वाधिक धावा आशुतोष शर्माने बनवल्या. आशुतोषने २८ बॉलमध्ये ६१ धावा ठोकल्या होत्यात. यात २ चौकार आणि ७ षटकारांसाह समावेश आहे. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

शेवटच्या ६ षटकांत पंजाब किंग्सला विजयासाठी ६५ धावा हव्या होत्या. मात्र त्यांच्या हातात केवळ ३ विकेट होत्या. दुसऱ्या बाजूला आशुतोष शर्मा क्रीझवर टिकून होता. तो तुफानी अंदाजात फलंदाजी करत होता. १६व्या षटकांत त्यांनी २४ धावा काढल्या. यावरून सामना फिरला. आता पंजाबला २४ बॉलमध्ये २८ धावांची गरज होती. १८व्या षटकांत आशुतोषची विकेट पडली. शेवटची २ षटके बाकी होती तेव्हा पंजाबला २३ धावांची गरज होती. जेव्हा हरप्रीत ब्रार २० बॉलमध्ये २१ धावा करून बाद झाला तेव्हा पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तर रबाडा बाद होताच पंजाबचा संघ १८३ धावांवर ऑलआऊट झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -