Friday, May 3, 2024
Homeक्रीडापीव्ही सिंधूचा सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

पीव्ही सिंधूचा सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सिंधुने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या सेईना कावाकामीला पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

सिंधूने ३२ मिनिट सुरु असलेल्या सामन्यात सेईना कावाकामीला २१-१५, २१-७ असे पराभूत केले. अंतिम फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अया ओहोरी किंवा चीनच्या जी यी वांग यांच्याशी होईल. या आधी जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जगात १९ व्या क्रमांकावर असलेल्या हैन यू हिला १७-२१, २१-११, २१-१९ असा पराभव केला होता.

२०२२ मध्ये सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी तिने सुपर ३००च्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. आता तिने प्रथमच सुपर ५००च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -