Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीविनामास्क फिरणाऱ्यांकडून दीड लाख दंड वसूल

विनामास्क फिरणाऱ्यांकडून दीड लाख दंड वसूल

सोनू शिंदे

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्या ७१९ नागरिक व ८ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून आठ दिवसात १ लाख ४१ हजारांचा दंड वसूल केला आहे.
उल्हासनगरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८०० पेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाचा संसर्ग असाच राहिल्यास, आरोग्य सुविधेवर ताण पडण्याची शक्यता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पगारे यांनी व्यक्त केली. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिक सर्रासपणे विनामास्क फिरत असल्याचे चित्र शहरात आहे.
विनामास्क असणारे नागरिक व दुकानदारांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली असून, ५ ते १२ जानेवारीदरम्यान ७१९ नागरिकांवर व ८ दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ४१ हजार ३०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

मास्क वापरा –  युवराज भदाणे, जनसंपर्क अधिकारी, उल्हासनगर महानगरपालिका

विनामास्क नागरिक व दुकानदारांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत देत मास्क वापरण्याचे आवाहन नागरिक व दुकानदारांना केले आहे. असे प्रकार वारंवार झाल्यास, गुन्हे दाखल करू.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -