Thursday, May 2, 2024
HomeदेशGoogle Drive : अरे देवा! काही नाही केलं तरी गुगल ड्राईव्हमधून आपोआप...

Google Drive : अरे देवा! काही नाही केलं तरी गुगल ड्राईव्हमधून आपोआप डिलीट होतोय डेटा!

नवी दिल्ली : डेटा बॅकअपसाठी अनेकजण गुगल ड्राईव्हचा (Google Drive) वापर करतात. मात्र आता काही नाही केलं तरी गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेला डेटा आपोआप गायब होत असल्याची तक्रार कित्येक यूजर्सनी केली आहे.

याला गुगलनेही दुजोरा दिला असून कंपनीने स्पष्ट केले आहे, की काही यूजर्ससोबत ड्राईव्हवरील डेटा गायब होण्याची घटना घडली आहे. 84.0.0.0 ते 84.0.4.0 यापैकी एक व्हर्जन वापरणाऱ्या यूजर्सना ही समस्या जाणवत आहे.

एका यूजरने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की त्याने गुगल सपोर्ट टीमच्या मदतीने डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. गुगल कम्युनिटी सपोर्टवर अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी आल्या आहेत.

दरम्यान, गुगल ड्राईव्ह टीमने आपण डेटा रिकव्हर करण्यासाठी तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे स्पष्ट केले आहे. तेव्हा, यूजर्सनी आपल्या बाजूने कोणतीही प्रक्रिया करू नये, तसेच चुकूनही डिस्कनेक्ट अकाउंट या पर्यायावर क्लिक करू नये, असे गुगलने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -