Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आंदोलनातील सहभागाचा एक तरी पुरावा...

Nitesh Rane : उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आंदोलनातील सहभागाचा एक तरी पुरावा द्यावा

आमदार नितेश राणे यांनी दिले खुले आव्हान

कणकवली : राम मंदिर आंदोलनात रामकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, संघ कार्यकर्त्यांच्या सहभागाचे पुराव्यासकट फोटो उपलब्ध आहेत. हे सर्व कोणकोणत्या आंदोलनात आघाडीवर होते, हे त्यांना सिद्ध करावे लागत नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतल्याचा एक तरी पुरावा दाखवावा. हा पुरावा दिल्यास सामनामध्ये एक महिना नोकरी स्वीकारेन, असे खुले आव्हान भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.

राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडे त्यांच्याच घरचे लोक संशयास्पद (डाऊटमध्ये) बघतात. अशी डाउटफुल असलेली व्यक्ती, संजय राजाराम राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे, हे हास्यास्पद आहे. हा २०२४ चा फार मोठा विनोद असल्याचे राणे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी तुमच्या मालकाची झोप उडविण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहेत. म्हणूनच ज्यांना सगळेच डाऊटफुली बघतात अशा, संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट, हाफ डाऊट बोलणे हा २०२४ चा फार मोठा विनोद आहे, अशा शब्दात आ. नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र डागले. कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तर उद्धव ठाकरे यांना धमकी आली, यावर माझा विश्वास नाही, असे मत व्यक्त करताना राणे यांनी ‘मातोश्री’मध्ये राहणारे उद्धव ठाकरे यांना मानेवर बसलेला मच्छर मारता येत नसल्याचे सांगितले. त्यांना धमकीचा फोन पाटणकरांच्या घरातून केलेला असेल. या बंटी – बबलीवर विश्वास ठेवू नका. स्वतःचे संरक्षण वाढविण्यासाठी हा बनाव असल्याची टीका आ. राणे यांनी केली. त्यापूर्वी ठाकरे कुटुंबाचे संरक्षण करण्याची जबाबदारी शिवसैनिकांकडे होती. मात्र आता निष्ठावान सैनिक राहिले नसल्याचे दिसदत आहे, असा टोला राणे यांनी लगावला. तसेच धमकीच्या फोनबाबत सीआयडी चौकशी करावी, असेही ते म्हणाले.

महायुतीचे कार्यकर्ते – नेते एकत्र काम करणार…

जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी धूस पुस असते पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा एक मॅग्नेट आम्हाला सर्वांना जोडलेला आहे. पण देशासाठी नरेंद्र मोदीच पाहिजेत या एकाच मतासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि नेते तुम्हाला एकत्र काम करताना दिसतील, असा विश्वास आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केला.काँग्रेस पक्ष हा गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याची टीका राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -