Thursday, May 2, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गआ. नितेश राणेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

आ. नितेश राणेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

कोकणच्या विकासासंदर्भात केली विस्तृत चर्चा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या सावंतवाडी येथील ‘सरस्वती’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी ॲड. राहुल नार्वेकर व आमदार नितेश राणे यांच्यात कोकणच्या विकासासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. कोकणच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रयत्नशील राहणार, असा शब्द विधानसभा अध्यक्ष अॅण्ड. नार्वेकर यांनी आ. नितेश राणे यांना दिला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -