Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीMahayuti Candidate : ठरलं! अमरावतीतून 'यांना' मिळणार उमेदवारी

Mahayuti Candidate : ठरलं! अमरावतीतून ‘यांना’ मिळणार उमेदवारी

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर पक्षांच्या मोर्चेबांधणीला आता सुरुवात झाली आहे. महायुती (Mahayuti) राज्यव्यापी मेळाव्यांचे आयोजन करणार आहे, तर महाविकास आघाडीचे (MVA) देखील निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असं असलं तरी महायुतीच्या हालचाली वेगवान आहेत, याची प्रत्येक वेळी प्रचिती येते. तर मविआमध्ये मात्र जागावाटपावरुनच संभ्रम आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.

अमरावतीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्याचे सांगत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रहारला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. त्याशिवाय नवनीत राणा यांना जर उमेदवारी हवी असेल तर त्यांनी प्रहारकडून लढावं असंही कडू म्हणाले होते. त्यानंतर आता महायुतीतील प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांनी नवनीत राणा या विजयी होतील असं म्हटल्याने राणा यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

बावनकुळे यांनी ही उमेदवारी जाहीर करताना महायुतीच्या नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून ५१ टक्के मतांसह विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. मात्र, राणा कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती, मात्र बच्चू कडू यांनी त्यांना प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवावी अशी मागणी केल्यामुळे राणा यांची उमेदवारी पक्की असली तरी चिन्ह पक्के झालेले नाही.

नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर राणा या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यंदाच्या वर्षी त्या कोणाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -