Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीHemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीत...

Hemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीत भीषण अपघात

सुदैवाने मोठी दुखापत नाही

नवी दिल्ली : नाशिकचे (Nashik) खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज ते नवी दिल्लीमध्ये (New delhi) गेले असता त्यांच्या गाडीला भीषण अपघात (Car accident) झाला आहे. राजधानी दिल्लीतील (Delhi) बी डी मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत मात्र, त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झालं आहे.

हेमंत गोडसे दिल्लीत येत होते, ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झालेली नाही. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत.

राज्यासह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह आहे. राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. नाशिकचं ढोल पथक या शिवजयंती सोहळ्याला दरवर्षी उपस्थित असतं. महाराष्ट्र सदनात या ढोलपथकाचं वादन असतं. याच कार्यक्रमाला हेमंत गोडसे जात असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोण आहेत हेमंत गोडसे?

हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटातील नाशिकचे खासदार आहेत. हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून झाली. २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी मनसेकडून खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ साली खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत मोठा विजय मिळवला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -