Sunday, May 5, 2024
Homeमहत्वाची बातमी‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये रविवारी नारायण राणे!

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये रविवारी नारायण राणे!

काही अंश खास आपल्या वाचकांसाठी… 

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची अवधूत गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत येत्या रविवारी रात्री ९ वाजता झी मराठी, या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’, या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. यातले काही अंश खास आपल्या वाचकांसाठी…

नारायण राणे – उद्धव ठाकरे यांनी सांगितले असणार राणेंना बोलवू नका म्हणून… मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा घर सोडलेले आहे. हॉलिडे इनमध्ये जाऊन ते कुटुंबासह राहिलेले आहेत. पण दोनदाही मी साहेबांना तयार करून त्यांना हॉलिडे इनमधून घरी आणले… एकच धमकी साहेबांना असायची. घर सोडायची…

अवधूत गुप्ते – आणि आता मित्रहो… वेळ झाली आहे रॅपिड राऊंडची. राजकारणात जास्त आश्वासक कोण वाटतं? निलेश राणे की नितेश राणे?

नारायण राणे – नितेश…

अवधूत गुप्ते- शिवसेना सोडून गेलेल्या कुठल्या नेत्याचे बंड व्यावसायिक स्वार्थासाठी नव्हतं? छगन भुजबळ, नारायण राणे की एकनाथ शिंदे…
नारायण राणे – …

अवधूत गुप्ते – इथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये काही वस्तू असतील. त्या भेटवस्तू आहेत असे समजून त्या तुम्ही कोणाला द्याल हे आम्हाला सांगायचं. श्रीफळ… कुणाला द्याल?
नारायण राणे- यांना देऊया ना… अनिल परबना…

अवधूत गुप्ते- अरे वाss… डायरेक्ट सिंधुदुर्गचे रेल्वेचे तिकीट आहे. हे तिकीट देऊन कोणाला कोकणात आमंत्रण द्यायला आवडेल?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -