Monday, May 20, 2024
Homeक्रीडाIPL 2024Hardik pandya: हार्दिक पांड्याच्या विरोधकांवर एमसीए करणार कारवाई?

Hardik pandya: हार्दिक पांड्याच्या विरोधकांवर एमसीए करणार कारवाई?

मुंबई : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पांड्याला संघाचं कर्णधारपद दिलं आहे. मुंबई संघाला पाच वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं गेल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. निर्णय क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही. पहिल्या दिवसापासूनच या निर्णयाला चाहत्यांनी जोरदार विरोध केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्समधील आतापर्यंतच्या सामन्यांत चाहत्यांकडून टीका केली गेली.

रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधारपद देणं हे मुंबईच्या फॅन्सला आवडलेलं नाही. क्रिकेटचं मैदान असो वा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी हार्दिकला ट्रोल केलं जात आहे. मुंबईचे गेले दोन सामने हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये पार पडले. हे दोन्ही सामने होम ग्राऊंडवर नव्हते. तरीही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं गेलं. मुंबईचा पुढील सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यातही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

परंतु आता हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. एमसीएने सुरक्षा वाढवली आहे. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हार्दिकला त्रास देणाऱ्या किंवा त्याला ट्रोल करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. अशा लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, अशा कोणत्याही गोष्टी एमसीए करणार नाही. या सर्व अफवा पसरवल्या आहेत असे एमसीएने स्पष्टीकरण दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -