Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीDental checkup camp : जोहे शाळेत विद्यार्थ्यांचे दंत चिकित्सा तपासणी शिबीर संपन्न

Dental checkup camp : जोहे शाळेत विद्यार्थ्यांचे दंत चिकित्सा तपासणी शिबीर संपन्न

इटली, रुसच्या परदेशी डॉक्टरांकडून ६७८ विद्यार्थ्यांची तपासणी

पेण : डॉ.जी.डी.पोळ फाउंडेशनचे वाय.एम.टी.डेंटल कॉलेज हॉस्पिटल खारघर, साई सहारा प्रतिष्ठान पेण आणि जोहेचा राजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल जोहे येथे विद्यार्थ्यांचे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न झाले. रुस, इटली व मुंबई येथील २० डॉक्टरांच्या टीमने जोहे शाळेमधील ६७८ विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी केली. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी डॉक्टर पाहुण्यांचे लेझीम पथकाने व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

सदर मोफत दंत चिकित्सा शिबिराचे उद्घाटन स्कुल चेअरमन अशोक मोकल, जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष नारायण म्हात्रे, कार्याध्यक्ष वैभव धुमाळ, साई सहारा प्रतिष्ठानचे विकी ठाकूर, प्राचार्य एस.आर.पाटील, डॉ.मॅथील्ड, डॉ.सिमोन, डॉ.डॅनियल, डॉ.आना, डॉ.ऍनेस्थेसिया, डॉ.वैभव कुमार, दीपक पाटील, धनंजय पाटील, अर्चना कटके, कुंभार, पन्हाळकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

या शिबिरात वाय.एम.टी.डेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी केली. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रशने दात घासण्याचे शारीरिक फायदे सांगून आपल्या स्वतःच्या दातांची निगा राखण्याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दातांच्या साफसफाईची वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. ज्युनिअर केजी ते इयत्ता ११ वी पर्यंतच्या ६७८ विद्यार्थी विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली.

इंटरनॅशनल क्लिनिकल एक्स्चेंज प्रोग्राम इन कलैब्रेशन विथ आय.ए.डी.एस. च्या माध्यमातून डॉ.कविता पोळ नलावडे, डॉ.मेघना वांदेकर, डॉ.नवनीत कुमार, डॉ.वैभव कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली इटलीचे डॉ.मॅथील्ड, डॉ.सिमोन, डॉ.डॅनियल, डॉ.आना, रुसचे डॉ.ऍनेस्थेसिया, मुंबई येथील डॉ.प्रणय, डॉ.संकल्प, डॉ.दामोदर, डॉ.राम, डॉ.शशांक, डॉ.स्वस्तिक, डॉ.आयशा, डॉ.आफिया, डॉ.मृणाल, डॉ.देवेन, डॉ.प्रीती, नवल आदींनी सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून योग्य ते उपचार केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -