Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाMc Mary Kom : मेरी कोमने दिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियान प्रमुख...

Mc Mary Kom : मेरी कोमने दिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियान प्रमुख पदाचा राजीनामा

अचानक हा निर्णय घेण्याचं काय आहे कारण?

नवी दिल्ली : तब्बल सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन (World champion) राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने (Boxer MC Mary Kom) आज पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियानाचे प्रमुख पद (Paris Olympics Chef De Mission) सोडल्याची बातमी समोर आली आहे. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पीटी उषा (PT Usha) यांना पत्र लिहून आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले.

मेरी कॉमने पत्रात लिहिले की, ‘देशाची कोणत्याही स्वरूपात सेवा करणे ही अभिमानाची बाब असते. मी हे पद स्विकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. मात्र मला खेदपूर्वक सांगावं लागतंय की मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही. मी वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत आहे. या प्रकारे मी या जबाबदारीपासून मागे हटत आहे याची शरम वाटते. मी कधी असे करत नाही. मात्र आता माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मी कायम करेन.’

आयओएने २१ मार्चला मेरी कॉमची या पदावर नियुक्ती केली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कॉमने कांस्य पदक जिंकले होते. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक खेळात भारतीय संघाची ती अभियान प्रमुख होती.

याबाबत पीटी उषा यांनी सांगितले की, ‘ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर आणि आयओए अॅथलिट आयोगाची प्रमुख मेरी कॉमला वैयक्तिक कारणामुळे या पदावरून हटावे लागत आहे याचा आम्हाला खेद आहे. आम्ही तिच्या या निर्णयाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करतो. मेरी कॉमच्या पर्यायाबद्दल लवकरच घोषणा केली जाईल. मी मेरी कॉमला सांगितले आहे की आयओए आणि माझा तिला कायम पाठिंबा राहणार आहे. मी सर्वांना तिच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करण्याची विनंती करते’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -