Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीपेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

पुणे सायबर सेलने चौकशीनंतर रात्री उशिरा केली अटक

पुणे : पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.

आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची (TET Exam) ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

पुणे सायबर विभागाच्या कार्यालयामध्ये ही चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आता अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या परीक्षांमध्ये देखील असाच घोळ झाल्यानंतर अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -