Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKonkan development : साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळवून देणारा कोका-कोला प्रकल्प रत्नागिरीत

Konkan development : साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळवून देणारा कोका-कोला प्रकल्प रत्नागिरीत

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

रत्नागिरी : राज्यात महायुती सरकार आल्यापासून ते राज्यासोबतच कोकणचा विकास (Konkan development) करण्यासाठीही नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. कोकणात अनेकविध प्रकल्प आणून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रत्नागिरीत (Ratnagiri) देखील एक नवा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोकण दौरा (Konkan Visit) नियोजित आहे. ते आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून हा त्यांचा चौथा कोकण दौरा आहे. या दरम्यानच रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु होणार्‍या कोका-कोला प्रकल्पाचे (Coca cola project) त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत.

या प्रकल्पासंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, या जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असा शब्द मी जिल्हावासियांना दिला होता. त्याच माध्यमातून सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सातशे कोटी गुंतवण्यात आले आहेत, त्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे एक वेगळी आर्थिक उलाढाल चिपळूण परिसरात होऊ शकते आणि स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, एवढ्या ताकदीचा हा प्रकल्प आहे, असं उदय सामंत म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -