जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

Share

मुंबई : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आजही तेलाच्या किमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या दीड महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या महिन्याभरात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…

1 hour ago

आज मुंबईत पाणीकपात !

जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…

4 hours ago

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दिवस

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…

4 hours ago

तिसऱ्या टप्पासाठी आज मतदान

महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य आज होणार ईव्हीएममध्ये बंद मुंबई :…

5 hours ago

विवेकानंद वैद्य प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती :शिबानी जोशी सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या…

5 hours ago

कोकणात कमळ फुलणार…

विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…

6 hours ago