ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत घमासान

Share

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत अशी सरकारची भूमिका आहे. यासंदर्भात आज  विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत या संदर्भातला प्रस्ताव आज विधानसभेत मांडला जाणार आहे.

ओबीसी आरक्षणावरून मध्य प्रदेशात निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता राज्यातही निवणुकांसाठी तोच पॅटर्न राबवला राबवला जाण्याची शक्यता दिसतेय. त्यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होतेय. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पुढचे किमान सहा महिने निवडणुका पुढे  ढकलाव्यात असा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

निवडणुका 4 ते 6 महिने पुढे ढकलल्या जाव्यात – विजय वडेट्टीवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 ते 6 महिने पुढे ढकलल्या जाव्यात ही आमची भूमिका आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.  निवडणुका पुढे ढकलल्यानंतर तरतुदींनुसार प्रशासक नेमला जाणार आहे.  मध्य प्रदेश सरकारनं ठराव करुन निवडणुका पुढे ढकलण्याची शिफारस केली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका 4 ते 6 महिना पुढे ढकलल्या जाव्या असा ठराव आज महाविकास आघाडी करते आहे.

ओबीसीशिवाय निवडणूका होऊ नये याकरता सर्वपक्षीय बैठक घेऊन विधानसभेचा ठराव करुन तो ठराव निवडणूक आयोगाकडे दिला जाईल. 4 ते 5 महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम करु. याकाळात डेटा गोळा करण्याचं काम होईल आणि प्रश्न सुटेल अशी 100 टक्के खात्री आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Recent Posts

उन्हाळ्यात आल्याचे सेवन करताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…

1 hour ago

Eknath Shinde : हिंदूत्व सोडले आता भगव्या झेंड्याची अ‍ॅलर्जी कारण तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…

2 hours ago

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

3 hours ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

4 hours ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

7 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

8 hours ago