विधिमंडळात कोरोनाचा शिरकाव

Share

मुंबई : सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे आणि अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 2 दिवसांत एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 2 दिवसांत 2 हजार 300 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. आज बीएमसी कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करणार आहेत. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त भाजप आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ज्यावेळी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या होत्या 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Recent Posts

अमेरिकेतील कँपस विद्यार्थी रस्त्यावर

विश्वरंग: उमेश कुलकर्णी काही देशांत विद्यार्थी चळवळींनी देशातील राजकारण बदलून टाकले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले,…

35 mins ago

KKR vs LSG: एकाना मैदानात कोलकत्ताचा राडा, लखनौला पाजला पराभवाचा काढा…

KKR vs LSG: लखनौ विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला आली. कोलकातासाठी…

2 hours ago

पेण मधील साई भक्तांचा खासदार सुनिल तटकरेंना पाठिंबा

दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पेण (देवा पेरवी): पेण मधील साई भक्तांनी…

3 hours ago

मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी…तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद….

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…

4 hours ago

राम मंदिरात जाण्यावरुन पक्षाचा विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा…

श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत…

5 hours ago

ICC Women’s T20 World Cup महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असणार भारताचे सामने

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप…

5 hours ago