Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीJay Shri Ram : चित्रपटातल्या श्रीरामांना भेटायला साक्षात आले हनुमान, Video Viral

Jay Shri Ram : चित्रपटातल्या श्रीरामांना भेटायला साक्षात आले हनुमान, Video Viral

मुंबई : बहुचर्चित आदिपुरूष (Adipurush) हा चित्रपट आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी चाहत्यांनी चित्रपट पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्याचवेळी या चित्रपटातल्या श्रीरामांना भेटायला साक्षात हनुमानजी आल्याचे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाले आहे. या व्हिडिओलाही तुफान लाईक्स मिळत आहेत.

आदिपुरूष या चित्रपटाला थिएटरमध्ये उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे चित्रपटच्या निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रत्येक थिएटरमधील एक सीट भगवान हनुमानासाठी रिकामी सोडण्यात आली आहे. तसेच आदिपुरूषच्या पहिल्या शोच्या अगोदर चाहत्यांनी हनुमानासाठी ठेवलेल्या राखीव खुर्चीवर हनुमानाची प्रतिमा ठेवून पूजन केले.

आदिपुरूष बघायला गेलेल्या काही चाहत्यांनी थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात खरेच एक हनुमानरूपी माकड थिएटरमध्ये आदिपुरूष बघण्यासाठी आले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार धुमाकूळ घालत आहे.

स्क्रिनवर प्रभू श्रीरामांच्या रुपात प्रभासची एंट्री झाली आणि अचानक थिएटरच्या एका खिडकीतून एक माकड डोकावून बघत आहे. त्या माकडावर लाईट मारून त्याचा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. थिएटरमध्ये आदिपुरूष बघायला स्वत: बजरंगबली आले असल्याचे हा व्हिडीओ बघणाऱ्यांनी सांगितले.

थिएटरमध्ये माकडाने एंट्री घेताच उपस्थित चाहत्यांनी जय श्रीराम, जय श्रीराम हे गाणे म्हणण्यास सुरू केले. गाणं ऐकत खिडकीतील माकड देखील प्रेक्षकांकडे तर कधी स्क्रीनवर दिसत असलेल्या श्रीरामांकडे बघत होते.

अगोदर हनुमानाची पूजा आणि नंतर आदिपुरूष थिएटरमध्ये आलेले हनुमानजी हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

प्रभासचा चित्रपट हिट होईल, कारण पहिल्या दिवशी हनुमानाने एंट्री घेऊन चित्रपटला आशिर्वाद दिल्याचे अनेकांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -