Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमानवी स्वभावातील विकृती ओळखणे महत्त्वाचे...

मानवी स्वभावातील विकृती ओळखणे महत्त्वाचे…

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

आज या लेखामार्फत आपण दररोज आपल्याला नित्य येणारे अनुभव आणि त्यातून होणारा त्रास तो का होतो? समोरचा नेमका काय म्हणून आपल्याशी तसं वागतो हे समजावून घेणार आहोत.

आयसोलेशन ज्याला आयसोलेट करायचे त्याला अशी वागणूक दिली जाते की, माझ्यासोबत राहायचे असेल तर माझ्याच पद्धतीने, नियमाने राहायचे. इतरांच्या सर्व गोष्टी, वागणूक, हालचाली, सवयी कंट्रोल केल्या जातात. मी तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे, आपले नाते खूप जवळचे आणि प्रेमाचे आहे. त्यामुळे तू फक्त माझे ऐकायचे आणि मी म्हणेल तसेच वागायचे याला एखाद्याला आयसोलेट करणे म्हणतात. यामध्ये व्हिक्टिमला इतरांकडून कोणताही डाटा मिळाला नाही पाहिजे आणि त्याने आपल्यालाच १००% खरं समजले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातात. प्लेयिंग द व्हिक्टिम अशा प्रकारे वागणारे लोक नेहमी व्हिक्टिम कार्ड प्ले करतात.

मी किती सफर झालो आहे, मी किती स्ट्रगल केले आहे. मी किती सहन केले आहे. माझ्यावर खूप अन्याय झाला. कायम झाला हे सांगून मी जे वागतोय ते बरोब्बर आहे. मी इतके केले आहे. तुम्ही काय केले? तुम्ही काय करता? असे बोलून इतरांना d humanize करणे. मी खूप वाईट परिस्थितीमधून गेलो हे सतत रंगवून सांगितले जाते. लव्ह बॉम्बिंग, लव्ह बॉम्बिंग हे एक प्रकारचे सायकोलॉजिकल abus आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत खूप प्रेम, अटेंशन देत राहायचे, खूप वचनं द्यायची, खूप जवळ करायचे, खूप स्वप्न दाखवायची. ती व्यक्ती पूर्ण आपली झाली की  demanding भूमिकेत जाऊन तिच्याकडून अनेक अपेक्षा करायच्या, आपण दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात. म्हणजेच कंडिशनल प्रेम करायचं याला म्हणतात लव्ह बॉम्बिंग. सायलेंट ट्रीटमेंट या पद्धतीने वागणारी व्यक्ती विक्टिमशी मुद्दाम वेगळं वागायला लागते. बोलणं बंद करणे, एकदम शांत राहणे, कामापुरता संबंध ठेवणे, काय झाले, काहीच स्पष्ट न सांगणे. यामुळे विक्टिम आपले काय आणि कुठे चुकले हा विचार करत बसतो आणि स्वतःला त्रास करून घेतो.

प्रोजेक्शन : यामध्ये प्रोजेक्शन करणारा स्वतःच्या चुका मान्य करतो. स्वतःला गुन्हेगार समजतो. पण त्यासाठी इतरांना अथवा परिस्थितीला जबाबदार धरतो. आपलीच १००% चूक आहे आणि आपणच जबाबदार आहोत हे माहिती असून पण defence mechanism चा वापर केला जातो. या ठिकाणी स्वतःची रिऍलिटी स्वीकारणे जमत नसल्याने ग्राउंड रिऍलिटीला ब्लेम केला जातो.

Passive aggressive behavior (Aggressive jockes) : यामध्ये नेहमी नॉर्मल, व्यवस्थित वागणारी व्यक्ती अचानक आणि मधेच खूप विचित्र वागते, विक्टिमला खूप त्रास होईल असं बोलतो, विक्टिम डिस्टर्ब होईल अशी ट्रीटमेंट देतो. अनेकदा विक्टिमला वाटतं त्याचा मूड नसेल, तो रागात किंवा दुसऱ्या विचारात असेल म्हणून असं वागला. पण अनेकदा हे समोरच्या समोर आपलं महत्त्व वाढविण्यासाठी ठरवून केलेलं manipulation असतं.

Smear Campain : यामध्ये दुसऱ्याची सामाजिक बदनामी मोठ्या प्रमाणावर केली जाते. एखाद्याचे व्यक्तिमत्त्व, व्यक्तिगत आयुष्य, त्याच्याबद्दलची थोडीशी चुकीची पण अर्धवट उपलब्ध असलेली माहिती त्याची मोठ्या प्रमाणावर निंदा केली जाते. स्वतःच गुडवील, स्वतःच समाजातील नावलौकिक वाढविण्यासाठी इतरांना सामाजिक स्तरावर बदनाम करून स्वतःचा स्वार्थ साधला जातो. यामध्ये व्यक्ती स्वतःच्या चुकांसाठी इतरांना जबाबदार धरते. त्याने तसं केलं म्हणून मी असं केलं, तो तसं वागला म्हणून मी असं वागलो, तो तसं बोलला म्हणून मी पण बोललो. अशा पद्धतीने आपल्या चुकीची ओनरशिप स्वतः न घेता ते इतरांवर ढकलने याला  deflection म्हणतात.

घोस्टिंग हा एक प्रकार घोस्टिंगमध्ये आपल्या दैनंदिन, रोजच्या आणि नित्य संपर्कातील व्यक्ती अचानक आपल्याशी बोलणं बंद करतो, आपल्याला मोबाइलवर ब्लॉक करतो, त्याला संपर्क साधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो काहीही प्रतिसाद देत नाही. असं वागून म्हणजेच घोस्टिंग करून ती व्यक्ती दुसऱ्याला मानसिक ताण आणि टेन्शन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. आपण अचानक संबंध का तोडले याबद्दल पण ती काहीही सांगण्यासाठी सुद्धा बोलत नाही. ब्रेड क्रॅबलिंग यालाच आपण पूश आणि पूल टेक्निक म्हणतो. हा कुटनीतीचा प्रकार असून यामध्ये अनेकांना एकाच वेळी थोडं थोडं प्रेम, काळजी दाखवली जाते. पण कोणालाच पूर्ण जवळ येऊ दिलं जात नाही अथवा आपलं सर्वस्व त्याला दिलं जात नाही. ब्रेड क्रबलिंग करणारी व्यक्ती सगळ्यांच्या भावनांशी एकाच वेळी खेळत असते.

आपण स्वतः कोणाशी असं वागत असाल तरी ते तातडीने थांबवा आणि कोणाहीपासून आपल्याला या स्वरूपात मुद्दाम त्रास दिला जात असेल, तर वेळीच सावध व्हा आणि स्वतःचे मानसिक संतुलन सांभाळा.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -