Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेThrowing Ink : अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक खरी की हाही एक बनाव?

Throwing Ink : अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक खरी की हाही एक बनाव?

नेटकरी म्हणतात ‘जे पेराल तेच उगवेल’

ठाणे : शरद पवारांना (Sharad Pawar) धमकी आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संधी साधत स्वतःच मलादेखील धमकी येत असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. ही धमकी देणारा मयूर शिंदे हा त्यांचाच निकटवर्तीय असल्याचे तपासातून समजले. यानंतर आता ठाकरे गटाच्याच सोशल मीडिया राज्यसमन्वयक अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काही महिलांकडून शाईफेक करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट (Tweet) करत माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच बनाव रचतात की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

कळव्यातील मनिषा नगरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी रात्री उशिरा अयोध्या पौळ यांना काही महिलांनी घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. याबद्द्ल अयोध्या पौळ यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

अयोध्या पौळ सतत ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. काल रात्री अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आहे, असे सांगून मला बोलावण्यात आले आणि आल्यानंतर शाईफेक करण्यात आली. १००-१५० महिलांचा आणि ४-५ मुलांचा हा ट्रॅप असल्याचं अयोध्या पौळ म्हणाल्या. विशेष म्हणजे पोलिस देखील हा प्रकार पाहत होते, असा आरोप पौळ यांनी केला.

या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस महिलांचा शोध घेत आहेत. दरम्यान काही नेटक-यांनी ठाकरे गटाला समोर ठेवून ‘जे पेराल तेच उगवेल’, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटक-याने तर चक्क प्रियांका चोप्राचा रंगपंचमीचा फोटो टाकून आता यालाही शाईफेक म्हणणार का, अशी खिल्ली उडवली आहे.

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -