Friday, May 3, 2024
HomeमहामुंबईINDIA आघाडीला संयोजकाची सध्या गरज नाही, उद्धव ठाकरेंचे विधान

INDIA आघाडीला संयोजकाची सध्या गरज नाही, उद्धव ठाकरेंचे विधान

मुंबई: मुंबईमध्ये विरोधी पक्षाच्या इंडिया (india) आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (shivsena uddhav thackeray) यांनी आघाडीच्या संयोजकांबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले सध्या आघाडीला संयोजकांची खास गरज नाही. आम्ही आपापसात सहमती करून १४ सदस्यांची कमिटी नियुक्त केली आहे.

उद्धव म्हणाले, या कमिटीचे सदस्य आघाडीशी संबंधित मुद्द्यांवर निर्णय घेतील आणि आपापल्या पक्षांच्या नेत्यांना याबाबत माहिती देतील. या समितीमध्ये काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, एनसीपीचे शरद पवार, डीएमके के एमके स्टालिन, शिवसेनेचे संजय राऊत, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, सपाचे जावेद खान, जदयूचे लल्लन सिंह, जेएमएमचे हेमंत सोरेन, डी राजा, एनसीके उमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्की हे सामील आहेत.

जागावाटपावर लवकरच होणार चर्चा

या बैठकीत २०२३ची लोकसभा निवडणूक एनडीए विरुद्ध लढण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दरम्यान, बैठकीत आघाडीच्या जागावाटपाबाबात कोणाचेही एकमत झाले नाही मात्र लवकरच राज्यातील जागा वाटपाची चर्चा सुर होईल. या दरम्यान आघाडीचे घोषवाक्य जुडेगा भारत, जीतेगा इंडिया हे जाहीर करण्यात आले.

इंडिया आघाडीच्या कॉर्डिनेशन कमिटी अँड इलेक्शन स्ट्रॅटेजी कमिटीशिवाय कँपेन कमिटीचीही निर्मितीही करण्यात आली. यात काँग्रेसचे गुरदीप सिंह सप्पल, जेडीयूचे संजय झा, आरजेडीचे संजय यादव, एसएसचे अनिल देसाई, एनसीपीचे पीसी चाको, जेएमएमचे चंपाई सोरेन, समाजवादी पक्षाचे किरणमय नंदा, आपचे संजय सिंह, सीपीआयएमचे अरूण कुमार, सीपीआयचे बिनॉय विश्वाम, नॅशनल कॉन्फरन्सचे जस्टिस हसनैन मसूदी, रालोदचे शाहीद सिद्दीकी, आरएसपीचे एमके प्रेमचंदन, एआयएफबीचे के जी देवराजन, सीपीआयएमएलचे रवी राय, वीसीकेचे तिरुमवलन, आययीएमएमएलचे केएल कामदर मोईदीन, केसीएमचे जोस के आणि टीएमसीच्या एका सदस्याचा समावेश आहे.

मुंबईत ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना म्हटले की जेव्हा मी लडाखला गेलो होतो तेव्हा मी स्वत: चीनच्या लोकांना तिथे पाहिले. लडाखच्या स्थानिक लोकांनी मला सांगितले की चीनबाबत पंतप्रधान मोदी खोटं बोलत आहेत. चीनने आमची जमीन ताब्यात घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -