Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेएसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन

एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसटीच्या ताफ्यात ५१५० ई बसचे लोकार्पण

ठाणे : काळ बदलत आहे, स्पर्धात्मक युग येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यात आता एसटीने देखील कात टाकली आहे. इलेक्ट्रीक एसी बस या प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध झाल्या आहेत. एसटी मागील कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रवाशांना सोय देत आहे. गावकरी आणि एसटी यांच्यात एक ऋणाबंधाचे नाते आहे, ते पुढेही जपले गेले पाहिजे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. असेही ते म्हणाले.
प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकुलित तरीही किफायतशीर दरात धावणाऱ्या ई बसचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील एसटीच्या खोपट डेपो येथे मंगळवारी करण्यात आले. एसटीच्या ताफ्यात ५१५० ई ई बसचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.

या ई बस बोरीवली – ठाणे – नाशिक या मार्गावर चालविल्या जाणार असून टप्यटप्याने राज्याच्या प्रत्येक भागात ही बससेवा सुरु होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशनचे कामही सुरु झाले असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले. ग्रामीण भागातील नागरीकासाठी एसटी ही लालपरी आहे. ग्रामीण भागातील प्रवाशी आणि वाहक, चालक यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. जिथे कोणतेही वाहन पोहचत नाही, तिथे एसटी पोहचत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर ५ हजाराहून अधिक डिझेल बसचे एल.एन.जी मध्ये प्ररावर्तीत करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बस सेवेत आल्यानंतर, निश्चितच प्रदुषणात घट होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील काही वर्षात एसटी देखील जोमाने काम करीत आहे, पर्यावरण समतोल राखण्याचे कामही आता एसटीच्या माध्यमातून सुरु झाले आहे. त्यामुळेच मागील काही वर्षात तोट्यात सुरु असलेली एसटीची सेवा आता पुन्हा अंशी चांगल्या पध्दतीने सुधारतांना दिसत आहे. एसटीचे डेपो स्वच्छतेसाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानकांतर्गत स्वच्छता मोहीमेसाठी एमआयडीसीकडून ६०० कोटींचा निधी दिला आहे. मागील आठ महिन्यांपासून त्यानुसार काम सुरु आहे. परंतु खोपट एसटी डेपोबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येथे रंगरंगोटी का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एसटी कर्मचाऱ्यांचे आजही काही प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. त्यानुसार माझ्या दालनात एकदा बैठक लावा, त्यात शॉर्ट टर्म, लॉंग टर्म पध्दतीने कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित धोरण ठरवू आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -