Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीIMEI : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला? 'हा' नंबर शोधून देईल तुमचा...

IMEI : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला? ‘हा’ नंबर शोधून देईल तुमचा हरवलेला फोन

मुंबई : प्रवासादरम्यान किंवा गर्दीच्या ठिकाणी कित्येकांचे मोबाईल चोरी होतात. अशा ठिकाणी चोर आपला हात साफ करून घेतात. एकदा चोरीला गेलेला फोन पुन्हा मिळेल अशी शाश्वती कोणाकडूनही मिळत नाही. अगदी पोलीस स्थानकात तक्रार केली तरीही मोबाईल चोरीच्या बाबतीत पोलीस हात वर करतात. मात्र मोबाईल मधील ‘हा’ नंबर तुमच्या हरवलेल्या फोनपर्यंत लगेचच तुम्हाला पोहोचवू शकतो. तसेच या नंबरच्या आधारे चोराचा शोध देखील घेतला जातो.

IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) हा १५ अंकी युनिक कोड आहे, जो प्रत्येक मोबाईल फोनला दिला जातो. एक प्रकारे हा फोनचा “फिंगरप्रिंट” आहे, ज्याद्वारे तो जगभरात ट्रॅक केला जाऊ शकतो. हा विशेष प्रकारचा नंबर आहे ,जो आपल्या मोबाईलचे लोकेशन सांगतो. हा नंबर मोबाईल फोनच्या बॅटरीवर लिहिलेला असतो. याच्या मदतीने मोबाईल वापरणारा यूजर कोठे आहे हे ओळखले जाते. आपला मोबाईल फोन हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यानंतर चोराने सिमकार्ड बदलला तरीदेखील IMEI नंबरच्या आधारे आपला फोन परत मिळविला जातो.

IMEI क्रमांकाचे महत्त्व

  • IMEI नंबर चोरीला गेलेला फोन ट्रॅक करण्यात मदत करू शकतो.
  • तुमचा फोन हरवला किंवा तो चोरीला गेला, तर तुम्ही IMEI नंबर वापरून टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून नेटवर्क ब्लॉक करू शकता.
  • बनावट फोन ओळखण्यासाठी IMEI नंबर देखील वापरला जाऊ शकतो.
  • काही प्रकरणांमध्ये, IMEI नंबरचा वापर वॉरंटी दावे करण्यासाठी किंवा विमा इत्यादीसाठी देखील केला जाऊ शकतो.

नेहमी सुरक्षित ठेवा IMEI नंबर

तुम्ही तुमचा IMEI नंबर कोणाशीही, विशेषतः अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नये. तुमच्या फोनवर मजबूत पासवर्ड किंवा पिन सेट करा. तुम्ही घराबाहेर असाल, तर तुमचा फोन नेहमी सोबत ठेवा. तुमचा फोन हरवल्यास किंवा तो चोरीला गेल्यास ताबडतोब पोलिस तक्रार नोंदवा. IMEI नंबर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यास आणि चोरीला गेल्यास तो शोधण्यात मदत करू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -