गुजरातमध्ये हिट अँड रन; काँग्रेस आमदाराच्या जावयाने ६ जणांना चिरडले

Share

आनंद (गुजरात) : गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील सोजित्राजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, ४ जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले ३ जण एकाच कुटुंबातील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार काँग्रेस आमदार केतन पादियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. केतन पादियार हे काँग्रेसच्या आमदार पूनमभाई परमान यांचे जावई आहेत. सध्या पोलिसांनी आमदार जावईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आमदार जावयाला अटक केली आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची माहिती देताना आनंदचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. कार, ​​बाईक आणि ऑटो रिक्षा यांच्यात भीषण टक्कर होऊन ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ऑटोमधील चार आणि दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. तर, कार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Recent Posts

Devendra Fadnavis : मानसिक संतुलन बिघडलेले उद्धवजी पवार साहेब सांगतील तेच करतील!

देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर बोचरी टीका छत्रपती संभाजीनगर : देशभरात निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत…

12 mins ago

Sangli Loksabha : सांगलीत मतदान केंद्रावर घडला ‘हा’ वादग्रस्त प्रकार

पोलीस आणि मतदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? सांगली : देशभरात होणाऱ्या लोकसभा…

3 hours ago

Chitra Wagh : तुमचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का?

मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंना चित्रा वाघ यांचा पत्रातून टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या…

3 hours ago

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच होणार विधानपरिषद निवडणूक!

जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान... मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…

4 hours ago

RBI : आरबीआयची नवी नियमावली; कर्ज वाटपासंदर्भात कडक सूचना जाहीर!

कॅश लोनवर असणार 'हे' नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नवे आर्थिक वर्ष…

4 hours ago

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी १७ मे रोजी पहिल्यांदा एकत्र मंचावर येणार मुंबई…

4 hours ago