Saturday, May 4, 2024
Homeटॉप स्टोरीEU's action on Google: गुगलला त्यांचे कारनामे भोवले! तब्बल इतक्या कोटींचा दंड

EU’s action on Google: गुगलला त्यांचे कारनामे भोवले! तब्बल इतक्या कोटींचा दंड

वृत्तसंस्था: गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला युरोपियन युनियन (EU) नियामकांनी गुगलला तब्बल २ हजार २९६ कोटींचा दंड ठोठावला आहे. इयु नियामकांना असे आढळले आहे की गुगल बाजारात स्पर्धाविरोधी कारवाया करत आहे.

युरोपियन युनियनच्या या पावलाने गुगलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्य आहे. २०२२ मध्ये कंपनीने वेगवेगळ्या सेवांतून २४.५ बिलियन (१८ लाख करोड़ रुपये) इतका नफा कमवला आहे. याबाबत इयु अँचीट्रस्टचे मार्गारेट वेस्टेजर यांनी म्हटले आहे की, गुगलला आपल्या एडटेक व्यवसायाचा काही भाग विकावा लागेल. गुगलच्या स्पर्धाविरोधी पद्धतींना आळा घालण्यासाठी इतर कंपन्यांना जागा आणि संधी द्यावी लागेल. जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तपासानंतर युरोपियन युनियनने गुगलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगलला करोडो रुपयांचा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दक्षिण कोरिया आणि भारताच्या एजन्सींनीही कंपनीवर कारवाई केली आहे. गुगलला मोठी बाजारपेठ आहे आणि कंपनीला मक्तेदारी हवी आहे, असे आरोप होत आहेत. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममुळे त्याचा युजरबेसही मोठा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -