Monday, June 17, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सGayatri Datar : निगेटिव्ह भूमिका साकारण्याची इच्छा होती

Gayatri Datar : निगेटिव्ह भूमिका साकारण्याची इच्छा होती

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

गायत्रीने बालपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. अबीर गुलाल ही तिची मालिका कलर्स वाहिनीवर २७ मेपासून दररोज रात्री ८-३० वाजता पाहायला मिळणार आहे. शाळेत असल्यापासून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत तिने भाग घेतला होता. स्पोर्ट्समध्ये देखील तिने भाग घेतला होता. जेव्हा ती शाळेत होती, तेव्हा एकदा स्नेहसंमेलनाला अभिनेता सुबोध भावेच्या हस्ते बक्षीस मिळाले होते. त्यावेळी ती सुबोधला म्हणाली होती की, मला तुमच्या बरोबर काम करायचे आहे. नंतर तिचे ते स्वप्न पूर्ण झाले. ‘तुला पाहते रे’ मालिकेत ती त्याची नायिका होती. तिच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. तिने ऑडिशन दिली.

तिची निवड झाली. मालिकेचे नाव होते,‘तुला पाहते रे’ अभिनेते सुबोध भावे सोबत काम करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले. सेटवर सगळ्यांनी तिला सांभाळून घेतले. तिला नवे शिकण्याची इच्छा होती. मालिकेचे तांत्रिक अंग तिने शिकून घेतले. या मालिकेमुळे प्रेक्षकांचे तिला खूप प्रेम मिळाले. त्या नंतर तिने ‘निम्मा शिम्मा राक्षस’ हे बालनाट्य केले. युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम केला. त्यानंतर एक वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ शो केला. नंतर तिच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला बिग बॉसमध्ये ती सहभागी झाली. बारा आठवडे ती बिग बॉसमध्ये राहिली. तिथे तिला भरपूर शिकायला मिळाले.

एखाद्याची सहनशीलता संपल्यानंतर ती व्यक्ती कशी वागेल, ते बिगबॉसमध्ये गेल्याशिवाय प्रेक्षकांना कळू शकणार नाही, असे ती मानते. कोणती गोष्ट आपल्याला आवडेल, कोणत्या गोष्टीचा आपल्याला राग येईल, याची जाणीव तेथे गेल्यावर झाली, असे ती म्हणाली. बिग बॉस मुळे तिची सहनशीलता वाढली. आपल्या आजूबाजूला कितीही निगेटिव्ह गोष्टी असल्या, तरी आपण कशा पद्धतीने सकारात्मक विचार करायचा, हे ती बिग बॉसमुळे शिकली. बिग बॉसमध्ये राहिल्यानंतर तिचा आत्मविश्वास इतका वाढला की, इतर ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत ती राहू शकते.

अबीर गुलाल ही मालिका कलर्स वाहिनीवर २७ मेपासून रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे. यामध्ये निगेटिव्ह भूमिका ती साकारणार आहे. या भूमिकेविषयी तिला विचारले असता, ती म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका करण्याची इच्छा होती. माझी निगेटिव्ह भूमिका साकारण्याची इच्छा होती. अशा भूमिकेसाठी मी थांबून होते. या मालिकेमध्ये मी शुभ्रा नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ती निगेटिव्ह भूमिका आहे. सेटवर ती मोठ्या आत्मविश्वासाने वावरत असते. सेटवर सगळ्यामध्ये खूप ऊर्जा व आत्मविश्वास आढळून आला. सेटवर सकारात्मक वातावरण असल्याने स्क्रीनवर चांगली मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शक, अभिनेत्री पायल जाधव, अक्षय या सर्वांसोबत काम करताना मजा आली. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा मला विश्वास आहे. गायत्रीने ट्रेकिंग, वाचन, प्रवास, गिटार वाजविणे, नृत्य हे छंद जोपासले आहेत. ‘अबीर गुलाल’ या तिच्या आगामी मालिकेसाठी तिला हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -